खानापुरातील पहिली लढाई
मुघली पातशाह मराठ्यांना संपवण्याच्या ऊद्देशाने स्वत: लाखोंचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात आला होता. छत्रपती संभाजींना हालहाल करुन मारले त्यानंतरही मराठे काही शरण येत नव्हते. महाराष्ट्राच्या छाताडावर नंगानाच चालुच होता.
मराठा व मोघल यांच्या युध्द सुरुच होते.
९जानेवारी १७०० रोजी जुल्फिकार याच्याबरोबर धनाजी जाधव, राणोजी घोरपडे आणि हणमंतराव यांचे युद्ध झाले. या लढाईत मराठ्यांना सपशेल हार पत्करावी लागली. त्याबरोबरच मराठ्यांची ५०० माणसं कामी आली. सर्वच बाजुंनी मराठ्यांना नुकसान सोसावे लागले.
धनाजी जाधव मसुर भागातच होते. झाले नुकसान भरुन काढणे गरजेचे होते. यासाठी धनाजीने योजना आखली की मोघली ठाण्यावर छापा टाकायचा व लुट करायची. आता फक्त कोणत ठाण हे ठरवायच होत. खटावला मोघल ठाणेदार कृष्णराव , खानापुरात ठाणेदार आवजी आढळराव तर बत्तीस शिराळ्यात शंकराजी होता. सर्वांची माहीती काढण्याची सुचना धनाजीने दिली. दोन दिवसात हरकार्या आला की खानापुचे ठाणे छापे घालण्यास ऊत्तम आहे. तिथे मुघली ठाणेदार आवजी आढळराव आहे व त्याच्याकडे २००० जात व ५०० स्वार अशी तैनात बादशाहाने दिलेली आहे.
ठरलं तर मग , हल्ला करायचा व लुट करायची. धनाजीने सर्वांना योजना समजावुन सांगितली. हल्ल्याचा दिवस ठरला, २३जानेवारी १७००.
मराठ्यांनी हल्ला केला आणि खानापूर कब्जात घेतलं.
ठाणेदाराला धनाजीने कैद केले, मिळतील तेवढी घोडी व लुट घेऊन धनाजी निघाले.
औरंगजेबाला २८जानेवारीला बातमी समजली की "खानापुरचा ठाणेदार आवजी आढळरावास धनाजीने पळवुन नेले"
बादशाहाने त्याची तैनात लगेच काढुन घेण्याचे आदेश दिले. आवजीला ४महिन्यांपुर्वीच म्हणजेच १२ ऑगस्ट १६९९ ला तरबियतखान मीर आतिश याच्या विनंतीवर खानापुरच्या ठाणेदारीवर नेमले होते . मराठ्यांनी आवजीच्या बदल्यात खंडणी मागितली. बादशहाने खंडणी देऊन आवजीला सोडावले.
अशा तर्हेने औरंगजेब मराठ्यांकडुन आणखी एक लढाई हारला.
खानापुरातील दुसरी लढाई
ईसवी सन १७७६ च्या एप्रिल मधली ही घटना . पेशव्यांचे राज्य सर्वत्र होते. छत्रपतींच्या अधिपत्याखाली पेशवे स्वराज्याचे साम्राज्य करीत होते. भगवानराव व भगवंतराव हे दोन्ही पेशव्यांकडील सरदार. या दोघांत काही कारणाने भांडण लागले. दोघेही एकमेकांच्या जिवावर उठले.हे भांडण मिटवणे पेशव्यांना देखील गरजेचे होते, तसा प्रयत्न सर्वच जण करत होते. याच वेळी भगवंतरावाकडे हणमंतभट नावाचा एक व्यक्ती होता. हा हणमंतभट कर्तृत्वाने शुर होता. हणमंतभटाने आपला मुक्काम खानापुरात ठोकला.
हणमंतभट खानापुरात आहे तर तेच ठाणे काबीज करावे असे भवानरावाने ठरविले, व त्यानी लष्करासह खानापुरकडे कुच केले. खानापुरच्या त्या भुईकोटात नक्कीच लढाई होणार हे नक्की होतं. भवानराव खानापुरच्या बाहेर आले, त्यांनी हणमंतभटास निरोप पाठविला. पण हणमंतभटाने गोळी चालविली ती थेट भवानरावांवर. भवानरावांनी पुरंदरावर पुरुषोत्तमराव दाजींना पत्र पाठविले व लिहीले की हणमंतभटाने आता माझ्याशी युद्ध आरंभिले आहे तरी आपण जातीने यावे, त्याला समजवावे व किल्ला माझे ताब्यात द्यावा. तसा लगेच दाजींना श्रीमंतांना निरोप धाडला व परवानगी मिळताच पुरंदरावरुन खानापुरकडे रवाना झाले.
या दरम्यान किल्ल्यात तुंबळ युध्द पेटले होते. याच वेळी हणमंतभटला समजले की दाजी किल्ल्याच्या बाहेर आहेत व आपणाला बोलावीत आहेत तसा तो किल्ल्याच्या बाहेर पडुन थेट दाजींच्या राहुटीत गेला .
तो दाजींना बोलला 'तुम्ही माझा जो निर्णय लावाल तो मला मंजुर असेल '.
दाजी बोलले 'आधि भवानरावाचे भेटीस चला'
'भवानरावाशी काही बोलणे झाले नाही आणि आपण भेटावयास जाण्याचे कसे काय बोलता' हणमंतभट बोलला
दाजींनी सांगितले की,' त्याची काळजी नसावी , तुमच्या केसास धक्का तो माझ्या जीवास धक्का, मी तुम्हास अभय देतो'
अशा तर्हेने हणमंतभटास घेऊन दाजी भगवानरावांकडे निघाले,भवानरावाच्या लष्करातील सर्व आश्चर्य करु लागले की हणमंतभट ईथे कसा. हणमंतभटास बाहेर थांबवुन दाजी भवानरावांच्या राहुटीत गेले.
भवानरावांनी दाजींना उठुन स्वागत केले व बोलले की,
'आपण आलात ते बरे केले'.
दाजी भवानरावांना बोलले की,' हणमंतभट आपले पदरचा असे असुन देखील त्याच्याशी लढाईचे काय प्रयोजन?.
'तोच किल्ला लढवितो आहे'- भवानराव
'मी त्यास भेटिस आणवितो'-दाजी
एवढे करुन तो भेटीस येईल असे आपणास वाटते?- भवानराव
तोच दाजींनी हणमंतभटास हाक मारीली.हणमंतभट राहुटीत आले, दाजींनी भवानरावांस सांगितले जे हणमंतभटास भेटावे. असे सांगुन दोघांची भेट घडविली. हणमंतभटाकडुन किल्ल्याची सोडचिट्टी लिहुन घेतली, व किल्ल्या ताब्यात घेतला, हणमंतभटाचा बंदोबस्त जसा होता तसा बंदोबस्त भगवानरावांनी करवुन घेतला.
अशा तर्हेने खानापुरच्या किल्ल्यातील एक लढा जास्त नुकसानी शिवाय संपला.
ओंकार खंडोजी तोडकर
2 टिप्पण्या
Chaan Tumchya mule amhala history kalte keep doing this great job.
उत्तर द्याहटवाGreat information,,,,, congratulations onkar,,,,Dhansing Hajare,panvel
उत्तर द्याहटवा