वामन आणि त्रिविक्रम - Vamna and Trivikrama
शेतकरी ज्याला बळीराजा म्हणतो तो म्हणजे कृष्णा चा भाऊ बलराम. बलराम आणि वामनाने ज्याला मारले त्या बळीचा परस्परांशी काही संबंध नाही.
वामन आणि त्रिविक्रम यांच्या विभक्त प्रतिमा
अंकित वामनेन स्याचक्र परमशोभनम |
अंकित वामनेन स्याचक्र परमशोभनम |
नानावृद्धिकरं चैतदंनाद्यं चाक्षय भवेत ||
अर्थात,
चक्र धारण केलेली वामनाची मूर्ती ही शुभ असते. अशी मूर्ती धनधान्य याची विविध प्रकारे वृद्धी करते.
गीतेतील वर्णना प्रमाणे जेंव्हा जेंव्हा धर्मावर संकट येईल तेंव्हा तेंव्हा भगवान विष्णु अवतार घेऊन संकटाचा नाश करणार. यालाच अनुसरून विष्णूंनी वामन अवतार घेतला. वामन अवतार जेंव्हा शिल्पात उतरतो तेंव्हा तो दोन शिल्पात विभागला जातो. एक म्हणजे वामन आणि दुसरा म्हणजे त्रिविक्रम. सध्या वामन पाहू आणि नंतर त्रिविक्रम.
वामन, बेलूर |
सदरची वामन मूर्ती बेलुर येथील आहे. एक बुटका ढेबरपोट्या, कानात कुंडल, डोक्यावर शेंडी, गळ्यात जानव, हातात छत्र धारण केलेला एक ब्राम्हण दाखवला आहे. त्याच्या समोर सुंदर मुकुट, सर्व अलंकारांनी अलंकृत एखाद्या राजासारखा शोभावा असावा बळी आहे. बळी त्या ब्राम्हणाला दान देत आहे असं शिल्प चित्रित केल आहे.
आता वामन अवताराची कथा समजून घेऊ. बळी नावाच्या राजाने स्वर्ग जिंकला आणि इंद्राला बाजूला करून स्वतः इंद्र झाला व पुढे त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले. सर्व देवांनी विष्णूचा धावा केला. बळी हा दानशूर म्हणवून घेत. विष्णूंनी एका सामान्य ब्राम्हणाच रूप धारण केलं आणि बळी कडे गेले. भिक्षा मागताना मात्र फक्त तीन पाऊले जमीन मिळावी एवढीच प्रार्थना केली. बळीने कबुल केले आणि तीन पाऊले मोजून जमीन घेण्यासाठी सांगितले. त्याच समयी भगवान विष्णूंनी विराट रूप धारण करून एक पाऊल स्वर्गलोकावर ठेवले, दुसरे पृथ्वीवर आणि बळीला विचारले आता तिसरे पाऊल कुठे ठेऊ तर त्यावर बळीने तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी सांगितले. तर अशा प्रकारे उतमात करणाऱ्या बळीचा नाश वामनरूपी भगवान विष्णूंनी जगाचा उध्दार केला.
त्रिविक्रम
वामन अवताराचा दुसरा भाग म्हणजे त्रिविक्रम. विराट रूप धारण करून वामनाने तीन पाऊलांच माप टाकलं म्हणून याला त्रिविक्रम नाव पडलं. याचेच शिल्प दक्षिण भारतात बघायला मिळतात. सदर शिल्प वामन शिल्पाच्या शेजारी ९० अंशात कोरले आहे.
त्रिविक्रमो वामनश्च वैश्यानाममर्चने शुभौ |
अर्थात, वामन आणि त्रिविक्रम मूर्तीच पूजन वैश्य लोकांसाठी शुभादायक असत.
त्रिविक्रम, बेलूर |
त्रिविक्रम, बेलूर |
शिल्पात त्रिविक्रमाचा डावा पाय जमिनीवर आहे तर उजवा पाय तीन पाऊले जमीन मोजण्यासाठी वर उचलला आहे. उजव्या पायाजवळ ब्रम्हा आहे जे भगवान विष्णुच्या पायावर गंगाजल सोडत आहेत. आता इथ ती गंगा विष्णुच्या पायावरून खाली येत आहे असं दिसतं पण त्यात निरीक्षण करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या गंगेच्या पाण्यात शिल्पकाराने मासे आणि कासव पण दाखवले आहेत. पायाशी उजव्या बाजूला विष्णूचे वाहन गरुड आहे तर डाव्या बाजूस चामरा आहे. हातात कमळ गदा चक्र आणि शंख आहे. मुळात या चार गोष्टीच्या अनुक्रम लक्षात घेता कुणीही जाणकार ही मूर्ती त्रिविक्रमाची आहे हे सांगू शकेल. एकूण मूर्तीचा रुबाब मोहक आहे.
वामन आणि त्रिविक्रम संयुक्त प्रतिमा
बदामी
दोन्ही शिल्प बदामीच्या गुहेतील असून वामन आणि त्रिविक्रम अवताराच्या संयुक्त प्रतिमा आहेत. होयसला साम्राज्यात काही ठिकाणी वामन आणि त्रिविक्रम दोन्ही वेगवेगळे कोरलेले दिसतात.
दोन्ही शिल्पात त्रिविक्रम मोठा दाखवला आहे. त्याचा उजवा पाय जमिनीवर तर डावा पाय उचललेला आहे. त्याच्या लाथेने राक्षस हवेत उडून गेल्याचे शिल्पकाराने खुबीने कोरले आहे. त्रिविक्रम अष्टभुज असून डावीकडील हातात तलवार, गदा, बाण, चक्र तर उजवीकडील हातात ढाल,धनुष्य,शंख, सुचीमुद्रा आहे. सुचीमुद्रेसमोर अक्राळविक्राळ तोंडाचा राक्षस दिसतो तो बहुधा राहू असावा.
त्रिविक्रमाच्या डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, गळ्यात दागिने, वनमाला आहे.
वामन आणि त्रिविक्रम, बदामी |
वामन आणि त्रिविक्रम, बदामी |
पायाशी वामन उभा आहे. एका शिल्पात वामनाची मूर्ती फोडली आहे त्यात त्याची फक्त छत्री ओळखू येते. वामन बुटका असून मोठ्या पोटाचा, गळ्यात जानवे आणि हातात छत्री घेतलेला आहे. त्याच्या समोर बळी राजा उदक सोडत आहे. बळीच्या मागे राक्षसाचे गुरु शुक्राचार्य दान देण्यापासून बळीला अडवत आहे. त्याच्या शेजारी बळीची बायको व इतर राक्षस उभे आहेत.
त्रिविक्रमाच्या वरच्या पायाजवळ गंगाजलाने विष्णुपद धुणारा ब्रम्हा असतो पण इथे मात्र राक्षस आहे.
गोंदेश्र्वर मंदिर, सिन्नर, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी गोंदेश्र्वराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरातील एका खांबावर वामन आणि त्रिविक्रम कोरले आहेत. छत्री घेतलेला वामन बळी कडून दान घेण्यासाठी झुकला आहे. तर शेजारी गदा, चक्र, शंख धारण केलेला त्रिविक्रम कोरला आहे.
वामन आणि त्रिविक्रम, सिन्नर |
पटदक्कल
कर्नाटकातील पटदक्कल येथील वामन आणि त्रविक्रम लहान पण तितकेच बोलके आहेत. एका बाजूला वामन बळी कडून दान स्वीकारत आहे. पण त्याचवेळी शुक्राचार्य दोघांच्या मध्ये येऊन बळीला थांबवत आहे. मध्ये त्रिविक्रम आहे. तर दुसऱ्या बाजूला गरुड नमुचीला मारत आहे.
वामन आणि त्रिविक्रम, पटदक्कल |
Vamana-
Shloka says
अंकित वामनेन स्याचक्र परमशोभनम |
नानावृद्धिकरं चैतदंनाद्यं चाक्षय भवेत ||
Which means
The idol of a dwarf holding a wheel is auspicious. Such an idol enhances the Wealth in various ways.
As described in the Gita, whenever there is a crisis on Dharma, Lord Vishnu will take an incarnation and destroy the crisis. Following this, Vishnu took the form of a dwarf. When the dwarf incarnation descends into the sculpture, it is divided into two sculptures. One is Vamana and the other is Trivikram. Let's look at Vamana now and then Trivikram.
Shloka says
अंकित वामनेन स्याचक्र परमशोभनम |
नानावृद्धिकरं चैतदंनाद्यं चाक्षय भवेत ||
Which means
The idol of a dwarf holding a wheel is auspicious. Such an idol enhances the Wealth in various ways.
As described in the Gita, whenever there is a crisis on Dharma, Lord Vishnu will take an incarnation and destroy the crisis. Following this, Vishnu took the form of a dwarf. When the dwarf incarnation descends into the sculpture, it is divided into two sculptures. One is Vamana and the other is Trivikram. Let's look at Vamana now and then Trivikram.
Vamana, Belur |
The idol is from Belur. A Brahmin is shown with a small butt, a Shendi on his head, a Janeu around his neck, and an umbrella in his hand. In front of him is a beautiful crown, adorned with all ornaments. The sculpture depicts the Bali giving alms to the Brahmin.
Let us now understand the story of the dwarf incarnation. A king named Bali conquered heaven and set Indra aside and became Indra himself and later he expelled all the gods from heaven. All the gods ran to Vishnu. Bali started calling himself as philanthropist. Vishnu assumed the form of an ordinary Brahmin and went to the Bali. While begging, he prayed for only three steps of land. The Bali confessed and asked to take the land by counting three steps. At the same time, Lord Vishnu took a huge form and placed one foot on the heavens, the other on the earth and asked the Bali where to place the third step. Bali asked him to place the third step on his head. So by destroying the victim who was thus wreaking havoc, Lord Vishnu in the form of a dwarf saved the world.
Trivikrama
The second part of the Vamana incarnation is Trivikrama. Taking the form of a giant, Vamana measured only three steps, hence the name Trivikram. The same sculptures can be seen in South India. This sculpture is carved 90 degrees next to the dwarf sculpture.
Shloka says,
त्रिविक्रमो वामनश्च वैश्यानाममर्चने शुभौ |
Which means
The idols of Vamana and Trivikram were auspicious for the worship of Vaishyas.
Trivikrama, Belur |
Trivikrama, Belur |
In the sculpture, the left foot of Trivikrama is on the ground while the right foot is raised to measure the ground got in alms. Near the right foot is Brahma who is releasing water of Ganga River on the feet of Lord Vishnu. Now it looks like the river Ganga is coming down from the feet of Vishnu, but the thing to observe is that the sculptor has also shown fish and turtles in the water of that river. On the right side of the foot is Vishnu's vehicle Garuda and on the left side is Chamara. In hand is the lotus mace wheel and conch. Basically, considering the sequence of these four things, one can say that this idol belongs to Trivikrama.
Vamana and Trivikrama
Badami
Both the sculptures are in the Badami Cave and are joint images of Vamana and Trivikram incarnations. In some places of the Hoysala Empire, Vamana and Trivikrama are seen carved differently.
Trivikram is shown large in both the sculptures. His right foot is on the ground and his left foot is raised. The sculptor has skillfully carved the monster into the air with his kick. Trivikram is an octagon with a sword, mace, arrow and wheel in the left hand and shield, bow, conch and suchimudra in the right hand. The monster with the big mouth in front of his hand must have been Rahu.
Vamana and Trivikrama, Badami |
Vamana and Trivikrama, Badami |
Trivikrama has a crown on his head, earrings in his ears, ornaments around his neck and a garland.
The dwarf is standing with his feet. An idol of a dwarf has been smashed in one sculpture in which only his umbrella can be identified. The dwarf is with a large belly, a Janeu around his neck and an umbrella in his hand. The King Bali is leaving Udak in front of him. Behind the Bali, the demon's guru Shukracharya is preventing the Bali from giving alms. Next to him are the Bali's wife and other demons.
At the upper foot of Trivikrama, there is a Brahma washing Vishnupada with Gangajala, but here there is a demon.
Gondeshwar Temple, Sinnar, Nashik
There is an ancient temple of Gondeshwar in Sinnar taluka of Nashik district. Vaman and Trivikram are carved on one of the pillars of this temple. The dwarf holding the umbrella is bent over to take donations from the Bali. Next to it, a trivikram holding a mace, a wheel and a conch is carved.
Vamana and Trivikrama, Sinnar, Nashik |
Patdakkal
Vaman and Travikram from Patadakkal in Karnataka are small but equally eloquent. On one side the dwarf is accepting donations from the Bali. But at the same time Shukracharya is coming between them and stopping the Bali. Middle one is showing Trivikrama. On the other hand, the eagle is killing Namuchi.
1 टिप्पण्या
🙏👌👌
उत्तर द्याहटवा