एखादी व्यक्ती मृत झाली की तिच्या शरीराचे दफन अथवा दहन योग्य रीतीने करणे जरुरीचे असते. ही परंपरा भारतात फार पूर्वी पासून आहे. दक्षिण भारतात महापाषाणीय स्मशानभूमी दिसून येतात. यामध्ये मृत व्यक्तीचे शरीर आणि त्यासोबत त्याची आयुधं अथवा दागिने देखील पुरले जातात.
कबर, ऐहोळे, कर्नाटक |
कधी कधी या कबरींमध्ये त्या व्यक्तीचे आवडीचे पदार्थ ठेवले जात. आत्मा अमर आहे हे ही कल्पना जवळजवळ सगळीकडे दिसते. म्हणून त्या व्यक्तीला ते अन्न मिळत राहावे या कारणाने त्यात पदार्थ ठेवत. स्त्रियांच्या बाबतीत बहुतेक ठिकाणी त्यांची आभूषण आणि काही सौंदर्य प्रसाधनं ठेवलेली दिसतात. अशा कबरींच्या उत्खननातून समकालीन आहार आणि इतर समाजजीवन कसे होते याचा अंदाज येतो. मृताचे शरीर त्याच्या चारही बाजूने फरशा लावून सुरक्षित केले जात. याच पद्धतीवरून पुढे कॉफिन हा प्रकार उदयास आला. सर्वात शेवटी फोटोत दाखवल्याप्रमाणे दगडांची मांडणी केली जाते.
काही ठिकाणी अशी देखील पद्धत होती की मृताचे शरीर उघड्यावर ठेवले जात व काही काळाने त्याच्या अस्थींच दफन केले जाई. अशा उघड्यावर ठेवलेल्या शवापासून इतर प्राणी पक्षी आपली भूक भागवत आणि मग उरलेली हाड फक्त पुरली जात. ताम्रपाषायुगीन लोक लहान मुलांचे दफन मात्र घरातच करीत. लहान मुलांच्या दफनाची पद्धत देखील निराळी होती. हे लोक लहान मुलांचे शव दोन भांड्यात अथवा मडक्यात ठेऊन त्याचे दफन करीत. डोक्याची बाजू एका भांड्यात तर पायाची बाजू दुसऱ्या भांड्यात घालून दोन्ही भांड्यांची तोंड एकमेकांना जुळवली जात. मृताचे डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे करून दफन केले जाई. घरात दफन केल्यामुळे या घरातील व्यक्ती काही काळ दुसऱ्या ठिकाणीं जाऊन राहत.
स्मशानभूमी, ऐहोळे, कर्नाटक |
मृतदेहाचे दफन करताना गेरूचे थर दिल्याचे देखील दिसून येते. काही ठिकाणी तर व्यक्तीच्या सोबत त्याचे पाळीव प्राणी जस की कुत्रा किंवा घोडा हे देखील दफन केलेले सापडतात.
जगाच्या पाठीवर दफनाच्या विविध पद्धती दिसून येतात. इजिप्त सारख्या ठिकाणी भलेमोठे पिरॅमिड बांधून त्यात सोन्याच्या शवपेटीत दफन केलेले दिसते. इथली एक कबर तुतनखामेन नावाच्या राजाची आहे. त्यांचं ज्यावेळी उत्खनन झालं त्यावेळी त्यात राजाच्या मनोरंजनासाठी खेळणी, सिंहासन, पलंग, सर्व लावजमा, राण्या, दास-दासी, दारू हे सर्व दफन केल्याचे दिसून आले. खुद्द राजाचे शव सर्व अलंकारांनी मढवून शुद्ध सोन्याच्या पेटीत ठेवलेले होते.
या सर्व स्मशानातुन तत्कालीन जीवनपद्धती आणि राहणीमान समजते. पूर्वीपासून जर का मृतांचे दहन करण्याची पद्धत असती तर हे पुरावे तेंव्हाच नष्ट झाले असते.
11 टिप्पण्या
chan
उत्तर द्याहटवाmahiti
खूप छान
उत्तर द्याहटवाछान माहिती दादा
उत्तर द्याहटवाछान माहिती
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवामाहिती 👍🤩🤩🤩
उत्तर द्याहटवा👌👍
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती दादा 👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर माहिती...
उत्तर द्याहटवाAapratim
उत्तर द्याहटवाChan mahiti
उत्तर द्याहटवा