लेखक: किरण मेंगले
पर्यटन हे क्षेत्र मर्यादित करून ठेवले तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या प्राचीन वास्तू, कलाकुसरी, मंदिरे, लेण्या असा ठेवा नकळतपणे देखील पाहता येत नाही.
प्रत्येक वेळी बॅग उचलून खचाखच भरलेल्या बीचेस, मंदिरे, गडकिल्ले यांना भेटी देण्यापेक्षा कधीतरी दुर्लक्षित, इतिहासात नावलौकिक मिळविलेल्या ठिकाणांना भेट देणे महत्त्वाचे ठरते.
थोडक्यात, आपल्या गावीच मी तुम्हाला घेऊन जाणारे...
मित्रहो, भारतात हस्तिदंताची कारागिरी फार प्रख्यात होती. या कारागिरांची संघटना होती व ती सधनही होती, मध्य प्रदेशातील विदिशा या नगरीचे हस्तिदंतावर कलाकुसर करणारे कारागीर प्रसिद्ध होते. खुद्द तेर येथे लामतुरे यांच्या संग्रहात हस्तिदंताच्या अप्रतिम स्त्रीमूर्ती आहेत. या बहुधा आरशाच्या मुठी म्हणून वापरल्या जात असाव्यात. स्त्रीमूर्तीच्या माथ्यावर छिद्र असून त्यात (बहुधा) चकचकीत तांब्याच्या पत्र्याच्या आरशाचे दांडे अडकविले जात. अशा स्त्रीमूर्ती भारतातून रोमन साम्राज्याच्या प्रदेशात निर्यात केल्या जात याचा पुरावा इटलीतील पॉम्पे येथे सापडलेली हस्तिदंताची लक्ष्मी' ची म्हणन मानली जाणारी मूर्ती. या मूर्तीची कलाकुसर अप्रतिम असून तिची उभी राहण्याची ढब, चेहऱ्यावरील लोभस भाव, केशरचना, अलंकार आणि मोहक शरीरयष्टी नजर खिळवून ठेवते. सुरुवातीस उल्लेखिलेल्या परकीय प्रवाशांच्या लिखाणात भारतातून हस्तिदंत व हस्तिदंताच्या वस्तू निर्यात केल्या जात असे निर्देश आढळून येतात. |
लामतुरे यांच्या संग्रहात असलेली हस्तिदंताची स्त्रीमूर्ती सुमारे साडे बारा सेंटीमीटर उंचीची असून तिचे पाय तुटलेले आहेत. चेहरा फारसा मनमोहक नसला तरी बांधा सडपातळ आणि आभंगात उभे राहण्याच्या ढबीमुळे कमनीय झालेला आहे . चेहरा गुबगुबीत, मोठे डोळे, सरळ धारदार आणि काहीसे चेहन्याच्या मानाने मोठे नाक, अधरोष्ठ वरच्यापेक्षा जाड अशी वैशिष्ट्ये आहेत. अलंकार मोजकेच. त्यात कपाळावर बिदी, कानात मोठे नक्षीदार डुल, दण्डावर एकेरी मण्यांचा अलंकार, गळ्यात वेलींच्या नाजूक पानांची नक्षी असलेला अघळपघळ हार आणि दोन्ही हातांत मनगटापासून ते कोपरापर्यंत एकास एक जोडून घातलेल्या बांगड्या आणि कमरेभोवती नक्षीदार मेखला असे मोजकेच दागिने दाखविलेले आहेत. पाठीमागून पाहिल्यास वस्त्र सकच्छ पद्धतीने नेसलेले दिसते. मात्र पुढ़न वस्त्र पारदर्शक असल्याने मांड्या उघड्या दिसतात. वस्त्राचे पीळ केलेले सोगे बाजूस सोडलेले आहेत. डाव्या मांडीवरील लोंबणारे पिळदार सोगे आणि (कदाचित) गोंडे डाव्या हाताने सावरलेले आहेत सबंध वस्त्र घट्ट राहावे म्हणन कमरेभोवती बांधलेले आहे. |
हात कोपरापाशी दुमडून कानापर्यंत वर नेलेला आहे. पाठीमागुन केशरचना स्पष्ट दिसते आणि ती अत्यंत कलात्मक विलोभनीय आहे. मस्तकाच्या मागे ती पंख्याच्या आकाराची असून मधोमध गोल फूल किंवा अलंकार खोचलेला आहे. कमरेत लचकून उभे राहण्याची ढब, नितंब आणि मांड्या उजवा आणि वेणीचे पेड एकमेकांत गुंतवून सरळ पाठीवर सोडलेले पाठीमागून स्पष्ट दिसतात.
तर हा असा सर्व विषय आहे...
तर कधी भेट देताय आमच्या तेरला??
कसे भेट द्याल-- धाराशिव(उस्मानाबाद जिल्हातून २४ कि.मी. अंतरावर वसलेले हे गाव असून एस टी बसेस तसेच खाजगी वाहनांचा नेहमी राबता असतो.
1 टिप्पण्या
👌👌👌
उत्तर द्याहटवा