Ticker

6/recent/ticker-posts

बडे माझी बोटं तुटली: जीवाशी बेतलेला अपघात आणि त्यातून घडलेले मजेशीर किस्से


बडे माझी बोटं तुटली: जीवाशी बेतलेला अपघात आणि त्यातून घडलेले मजेशीर किस्से


कुणाला सांगितलं नाही म्हणून, की दुसरं काही कारण ते माहीत  नाही😏  पण निघाल्यापासूनच साडेसाती मागे लावून घेतलेल्या हंपी बदामी च्या सफरीमधील महत्वाचे ठिकाण ऐहोळे येथील मंदिर समूह पाहून झाल्यावर गावाच्या शेजारी असणाऱ्या टेकडीवर एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यात एक मंदिर आहे ते पाहण्यासाठी आमची चांडाळ चौकडी मार्गस्थ झाली. 

                            😍 नेहमीच्या सवयीप्रमाणे समोरील रस्ता सोडून किल्ल्याच्या मागील बाजूने टेकडी सर करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. 😎 माझ्या पुढे असलेल्या Sunny, Satish अन ओँकार खंडोजी तोडकर या तिघांनीही मला किल्ल्याच्या बुरुजाजवळून आत घुसताना पुरातन स्मशानभूमी चे काही फोटो घेऊन येण्याची ताकीद दिली. झक मारत एकटा स्मशानभूमीत फिरत होतो अन फोटो घेत होतो.😡 आत मध्ये गेलेली तिघे जण काय करत होती अन काय नाही माहीत नाही पण जेव्हा मी बुराज्याच्या खाली पोहोचलो तेव्हा तिघेही किल्ल्याच्या आतील मंदिरावर जाऊन बसलेले दिसले. त्या मंदिरातूनच छतावर जाण्यासाठी झरोका आहे, त्याला वर लोखंडी दरवाजा आहे जो ड्रेनेज प्रमाणे 90 अंशात वर उघडतो. मी बुरुज्याखाली असताना त्यांना वरून काही फोटो घ्यायला सांगितले तर तिकडून फोटो ऐवजी शिव्या चालू झाल्या. 😡 मी आपला गप यांचे फोटो घेऊन मनातून शिव्या देत खाली उतरून मंदिराकडे चालत गेलो. याचवेळी आत मध्ये गावातली काही लहान मुले जमली होती. मंदिराचे बाहेरून काही फोटो घेऊन आत जाई पर्यंत वरील दोघे जण खाली आलेले. मी मंदिरात नुकताच प्रवेश करून विचारातच होतो की मंदिर नेमकं कसलं आहे , त्याचवेळी वरून धपकन गेट पडल्याचा आवाज आला अन त्यापाठोपाठ आमचा आमचा मास्तर स्वतःच हात हातात घेऊन आला, अन म्हणतो कसा, 


" ओ बडे माझी बोटं तुटली....  माझा शाहिस्तेखान झाला". 😭 कशी तरी कसरत करत छतावर गेलेले हे लोक, छताच्या बांधणीचा अभ्यास केला आणि खाली उतरताना तो दरवाजा खाली पडला तो थेट हातावर. मग काय हाताची तीन बोट चौकटीच्या लोखंडी अँगल आणि दरवाजात सापडली आणि डायरेक्ट तुटली . 

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole

मधल्या बोटाचे हाड मधून तुटले, शेजारच्या बोटाचा सांधा तुटला, २ बोट सांध्यातून निसटली. मला तर काहीच समजत नव्हतं समोरची मूर्ती पाहू की याची बोटं? 😑 झक मारून कॅमेरा बॅगेत टाकला अन त्याचा हात पाहू लागलो तर मधल्या बोटाच हाड तुटून एकमेकांवर चालून त्याचा Z शेप झालेला. ओढून कशी  तरी जाग्यावर बसवली पण फायदा होत नव्हता, परत त्यांचा Z आकार व्हायचा. 🤔 मग पटकन चपटा दगड बघून त्यावर ओढलेला हात पट्टी केलेल्या रुमालाने बांधला. या गडबडीत एक चांगला रुमाल खराब झाला. यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे तिथं गोळा झालेली मुलं समोर तुटलेला हात पाहूनही चॉकलेट साठी पैसे मागत होती.😡 एवढासा छोटासा नॉर्मल accident अन आम्हा सगळ्यांना एकच टेन्शन ,  आता हंपी कॅन्सल होणार.😂 

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole


दोघांना पटकन मागच्या बाजूने जाऊन गाडी आणायला पाठवलं अन आमी दोघेही पुढून उतरायचं ठरवलं. उतरताना मास्तर काय थांबायला तयार नाही अन मला तर रस्त्यातल्या लेण्या खुणावत होत्या.😍 त्याला म्हटलं तू हो पुढं मला दम लागलाय म्हणून काही फोटो घेऊन पटकन खाली पोहोचलो. नशीबच खराब ओ रविवार होता अन गावातली सर्व हॉस्पिटल बंद, मग गावात सरकारी दवाखान्याची चौकशी केली तर लांबवर एका पांढऱ्या बिल्डिंग कड एक दोघांनी बोट दाखवलं. तोपर्यंत धक्का मारून चालू करावी लागणारी गाडीपण आली आणि तडक सरकारी दवाखाना गाठला. दोघांनी धक्का मारून गाडी कशी चालू केली याचा अजूनही विचार करतोय.😂 दवाखान्यात पोहोचल्यावर गाडी बंद करू नका अस पहिलेच सांगून ठेवलं कारण योग्य उपचार इथं होणार नाहीत आणि आपण परत काय गाडी ढकालणार नाही.😎 आत गेलो तर आतमध्ये फक्त एक नर्स आणि तिच्या सोबतीला कोणीतरी लेडीज होती. ती नर्स एवढी सुंदर होती की क्षणभर नक्की का आलोय हे सगळेच विसरून गेलो.😍सुंदरतेच्या सगळ्या व्याख्या तिला लागू पडत होत्या.❤  मास्तर तर आपलं काही दुखतंय आपल्याला काही झालंय हे विसरून गेलेला. त्यात भाषेमुळे बोलताना प्रॉब्लेम. रुमालाने दगडाच्या सपोर्टने बांधलेला हात पाहून ती भलतीच खुश झाली. पण तिच्यापेक्षा जास्त मी खुश कारण तो दगड मी बांधून दिलथा. 😊 आतमध्ये ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर परत सर्व पट्टी सोडून तिने कार्ड पेपर बांधलं आणि पेन किलर चा इंजेक्शन दिलं. इंजेक्शन घेताना ह्या माणसाला एक हाताने पॅन्ट पण काढता येईना.😂 मी तर लांबूनच पाहात नावाला उभा राहून बघ्याची भूमिका बजावत होतो .😂 अन बाकी दोघे तर घाबरून बाहेर डायरेक्ट. आधीच भाषेचा प्रॉब्लेम अन आमचा सनी नर्सला म्हणतो कसा, चला सगळं फटदिशी आवरा.😂 सर्व झाल्यावर बागलकोट च्या दोन तीन हॉस्पिटल चे नाव लिहून घेतले अन गोळ्या घेऊन निघालो. किल्ला पाहायचा राहिलेला, मास्तर चे बोटं तुटलेली , अन गाडीत फक्त नर्स ची चर्चा. सगळेच उपाशी मित्र मंडळ जमा झालेलं.😂 बागलकोट ला एक्सरे काढून नक्की काय झालं ते चेक केल्यावर विजापूर मार्गे घरी निघण्याचा प्लॅन ठरला. पण नाही,  आमच्या अंगात खालून वरून रेहमानी किडा असा भरलाय ना की एवढ्या लांब आलोय तर हंपी करूनच जायचं अस ठरलं. मास्तर म्हणतोय की मी एकटा जातो पण नाही, जायचं तर सगळ्यांनी सोबत. दोन तीन डॉक्टर मित्रांला कॉल करून सर्व विचारल्यावर ऑपरेशन दोन दिवसांनी केलं तरी जमेल असं समजलं. त्यामुळं सगळ्यांच्याच आनंद गगनात मावेना 😍 अन गाडी लगेच हंपीच्या दिशेने मार्गस्थ झाली ती पण तुटलेली बोटं सोबत घेऊन. त्यात झोपताना त्याच्या हातावर लक्ष ठेवायचं काम माझ्याकडेच दिलं. झोप काढू की या गैबाण्याकड लक्ष ठेऊ.😏 तब्बल तीन दिवस तो तुटका हात घेऊन तसाच फिरत होतो आमी, फोटो काढत होतो, किल्ले पाहत होतो. या सर्व प्रसंगात अशी काही ठिकाणे भेटली की तुटलेल्या बोटांचं दुखणं त्यासमोर काहीच नव्हतं. 

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole
ऑपरेशन चालू असताना patient बेड वर झोपलेला sunny

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole


असो शेवटी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्यावर लगेच फोन करून डॉक्टरानला उद्या सकाळी सकाळी ऑपरेशन करायला येतोय असा कॉल टाकला. तरी ऑपरेशन व्यवस्थित झालं असून, ऑपरेशन चालू असताना सोबत गेलेले पोरं निवांत बेडवर पडून झोपा काढत होते.😂  हे सगळं घडलं याची कोणाच्याही घरच्यांना कानोकान खबर नाहीय. कारण पुढं अजून फिरायचाय ना.🤗  तेवढं मात्र ज्यांना कोणाला मास्तर ला भेटायचं असेल त्यांनी बिस्कीट, फळं  वैगेरे घेऊन पुण्यात जाऊन भेटू शकतात.😂 आणि हो तो हाताला बांधलेला दगड मी आठवणीने गाडीत ठेवलाय😂 मोडलेल्या बोटांच्या आठवणीत, वेळेवर कामी आला म्हणून😂😂😂

 नार्मल हाय रे 😂😂😂

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole

Accident_अपघात_हंपी_बदामी_aihole


अशाप्रकारे तब्बल अडीच महिने आपल्यात सामावून घेतलेले ३ rod बाहेर काढल्याने बोटाने मोकळा श्वास घेतला. आम्ही आपले निर्लज्ज पणाने डॉक्टर कडून, ते rod मागून आणले आहेत😉😂आठवण म्हणून बाकी काही नाही.. आतापर्यंत एकूण ३ x-ray काढले , ते सगळे मित्रांनी ग्रहण बघण्यासाठी आपापसात वाटून घेतले आहेत 🤦🏻‍♂️.(खर तर असले मित्र माझ्या आयुष्याला लागलेले ग्रहण आहेत). हंपी बदामी , त्यात तुटलेली बोट , तुटलेली बोट घेऊन फिरलेले ३ दिवस , बोटात वायर असताना पण प्रत्येक रविवारी सलग केलेली भटकंती याच काय त्या आठवणी बाकी सगळं हमालीच आयुष्य आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या