लज्जा गौरीला अदिती देखील म्हटलं जातं.लज्जा गौरी किंवा अदिती यांचा संबंध थेट जन्माशी येत असल्याने तीला मातृदेवी म्हणून संबोधतात आणि त्या कारणास्तव यांची सर्व शिल्प योनी प्रदर्शित करतात तसेच उत्तनपाद अवस्थेत असतात. या अवस्थेचा उल्लेख ऋग्वेदात देखील आहे.
ऋग्वेदात खालीलप्रमाणे काही संकेत मिळतात.
देवानां पूर्व्ये युगे असतः सत् अजायत |
तत् आशाः अनु अजायन्त तत् उत्तान-पदः परि ||
भूः जजे उत्तान-पदः भुवः आशाः अजायन्त |
अदितेः दक्षः अजायत दक्षात् ओं इति अदितिः परि ||
याप्रमाणे सर्वप्रथम "असत्"
पदार्थापासून "सत्" असें विश्व उत्पन्न झाले, त्याच्यापासून दिशा म्हणजे आकाश उत्पन्न झाले, ते अत्युच्च अशा उत्पादक शक्तीपासून उत्पन्न झाले
त्याच उच्च शक्तीपासून पृथ्वी उत्पन्न झाली. पृथ्वीपासून दिशा निर्माण झाल्या. नंतर अदिति आणि त्याच्यापासून चातुर्यबल उत्पन्न झाले आणि त्याच बलापासून स्वाधीनता प्रकट झाली.
हीच उत्तानपाद अवस्था प्रसूतीच्या वेळी योग्य आहे असं चरक आणि सुश्रुत संहितेत म्हटलं आहे. एकंदर मातृत्व असो किंवा त्याची अवस्था यावर सविस्तर वर्णन सगळीकडे आहे. |
याच ऋग्वेदात पुढे अजून एक उल्लेख येतो तो असा
अदितिद्यारदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः |
विश्वे देवा अदितिः पञ्च जना अदितिर्जातमदितिर्जनित्वम् ||
अदिती सर्वकाही आहे. आभाळ, माता, पिता, पुत्र, संपूर्ण देवाधिदेव, पंचजन म्हणजेच ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य, शूद्र व निपाद आणि पुढे जे काही उत्पन्न होईल ते सर्व काही अदितीची रूपे असतील.
रेणुका, मतींगी, गौरी, पार्वती यासह २० हुन अधिक नावांनी लज्जा गौरीला ओळखलं जातं.
योनी तंत्रं मध्ये पार्वती महादेवांना म्हणते
त्वां विना जनकः कोऽपि मां विना जननी परा |
अर्थात तुमच्याशिवाय जगाचा पालनकर्ता कोणी नाही आणि माझ्याशिवाय माता कोणी नाही.
वरील लज्जा गौरी पेडगाव किल्ल्यातील मंदिराच्या खांबांवर कोरलेली असून तिच्या हातात कमळ नसून दोन नाग आहेत जे तिच्या योनीतून बाहेर आलेले दिसतात. |
शिल्प:
लज्जा गौरीची शिल्प जवळपास सर्वच युगांत आढळतात आणि त्यात वैविध्य देखील दिसते. आधी सांगितल्याप्रमाणे लज्जा गौरी उत्तानपाद अवस्थेत असतात तर यांच्या मुखाच्या जागी कमळ पहावयास मिळते. चेहऱ्याच्या जागी कमळ असेल तर हातात देखील कमळ असतेच. या प्रकारातील सर्वात सुंदर लज्जा गौरी बदामी येथील संग्रहालयात आहे. उन्नत स्तन आणि फुगीर पोट पाहून असं वाटत की नुकताच कुणाला तरी जन्म दिला असावा.
एखादे छोटे का असेना पण लज्जा गौरीचे शिल्प पुरातन मंदिरावर पाहायला मिळते. काही ठिकाणी त्या लहान शिल्पाची देखील पूजा केली जाते. यामागे भावना असते ती फक्त मातृत्वाची. यावरून स्त्रिया आणि मातृत्व यांच्याप्रती भारतीयांची कृतज्ञता दिसून येते.
6 टिप्पण्या
Chan mahiti..
उत्तर द्याहटवाछान लेख... लज्जागौरी शिल्प मातृत्वाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते. अनेक ठिकाणी महामाया पार्वतीचं रूप म्हणूनही ओळखले जाते.
उत्तर द्याहटवामहान भारतीय संस्कृतीच्या अनेक दृश्य अंगांपैकी सृजनशिलता या महत्वाच्या अंगाचे सहेतुक प्रदर्शन करणारे शिल्प म्हणजे लज्जागौरी.
लेख अजून विस्तृत करता आला असता असे मला वाटते. अधिक अभ्यास, भटकंतीच्या जोरावर तुम्ही तो नक्की लिहू शकता....
छान लेख....👍👍💐
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाकोल्हापूर मध्ये ही अशीच एक सुंदर मूर्ती आहे.मंगळवार पेठेत गजेंद्र लक्ष्मी स्वरूपात ही मूर्ती आहे.कोल्हापुरातील नवदुर्गा पैकी द्वितीय दुर्गा मूकांबिका मुक्तांबिका आहे
उत्तर द्याहटवाछान माहितीपूर्ण लेख ...💐💐💐
उत्तर द्याहटवाPl. Give more illustrations and more photos for ecplsinations.
हटवा