शास्त्रात चार पुरुषार्थ सांगितले आहेत.
मोक्ष, धर्म, अर्थ आणि काम. या प्रत्येकाचे शास्त्र, विद्या आणि कला वेगवेगळे आहेत.
यापैकी काम पुरुषार्था चे शास्त्र म्हणजे कामशास्त्र तर रूप, गंध, रस, शब्द, स्पर्श या त्याच्या विद्या असून नृत्य, वाद्य, चित्र त्याच्या कला आहे. कामाच्या कला एकूण चौसष्ट आहेत त्या सगळ्याचा उहापोह इथे करणे शक्य नाही.
याच काम गुणाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे कामदेव. याची पत्नी म्हणजे रती. कामदेवाला मदन, मन्मथ, रतिकांत, मनसिजा, पुष्पवान, कंदर्प, समरहरि, चित्तहर अशी देखील नावे आहेत.
कामदेवाचे लांच्छन म्हणून एका हातात ऊस असतो तर दुसऱ्या हातात बाण असतो. पुराणात कामदेवाचे डोळे आणि कपाळ यांचं विस्तृत वर्णन केलेले आहे. त्याच्या डोळ्यांना बाण म्हटलं गेलाय तर कपाळाला धनुष्य. या कपाळरुपी धनुष्यातून निघालेले बाण ज्या व्यक्तीवर घात करतील त्याची काम या गुणातून सुटका नाही असा त्याचा अर्थ.
शिल्पात ज्यावेळी कामदेव प्रकट होतात त्यावेळी ते सहसा रती सोबत असतात. रतीचा जन्म कामदेवाच्या डाव्या कुशीतून झाला अस उल्लेख ब्रह्मवैवर्त पुराणात आहे तर दक्ष प्रजपतीच्या घामातून रतीचा जन्म झाल्याची कथा आपणाला कालिका पुराणात वाचायला मिळते. कामकला, रेखा, कामी अशी काही रतीची नावे आहेत. कामदेवाच्या अजून एका पत्नीचे वर्णन मिळते ती म्हणजे प्रीती.
महादेव आणि कामदेव:
महादेवांनी काम देवाला आपल्या तिसऱ्या नेत्राने भस्म केले होते ज्याची कथा पुराणात आहे. राक्षसांनी पृथ्वीवर हाहाकार माजविला होता. राक्षसांचा राजा तारकासुर देवांना तसेच सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होता. खूप तपश्र्चर्येनंतर त्याला वरदान मिळाले होते की त्याचा मृत्यू फक्त महादेवाच्या पुत्राच्या हातून होईल. सर्व देवांनी कामदेवाचा आणि रतीच धावा केला. या दोघांनी उत्तम नृत्य करून शिवामध्ये काम भाव उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही सफल होत नव्हता म्हणून कामदेवाने आपल्या उसाच्या धनुष्यातून बाण सोडला ज्याने महादेवाची ध्यानमुद्रा भंग पावली. रागात महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म केलं. पण पार्वतीच्या तपश्चर्या पाहून महादेव प्रसन्न झाले. दोघांचं विवाह झाला आणि मग कार्तिकेय किंवा स्कंद याचा जन्म झाला. देवांनी कार्तिकेयाच्या मदतीने तारकासुराचा वध केला.
कम देवाचे वाहन हत्ती आहे तर काही ठिकाणी पोपटाचा देखील उल्लेख येतो.
3 टिप्पण्या
मस्त... keep it up brother.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर पद्धतीने विषयावर प्रकाश टाकला तुम्ही धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप मस्त आहे माहिती ...Very informative ✌️👍
उत्तर द्याहटवा