सर्वप्रथम हरियाणा सरकारचे आभार ज्यांनी पानिपत मध्ये स्मारक उभं केलं आणि त्याची निगा देखील उत्तमरीत्या राखली जाते. काला आम नावाच्या ठिकाणी हरियाणा सरकारने महाराष्ट्रात नाही इतकं सरस स्मारक बांधले आहे.
मराठे काय करू शकतात हे याच ठिकाणी दाखवून दिले . 
अब्दाली जो गेला तो परत फिरकला नाही. लढाईच्या दिवशी मराठ्यांची परिस्थिती अशी होती की जानेवारीतील उत्तरेतील कडाक्याची थंडी, खायला प्यायला काहीच नाही. प्रसंगी मराठ्यांनी शाडूची माती आणि झाडाचा पाला खाल्ला. पोटाचे खळगे अजून आता गेले होते, पाठ आणि पोट एक झाले होते. त्यात कुटुंब कबिला बरोबर त्यांची काळजी घेणे जरुरी होते. गनिमी काव्याची सवय असणारे मराठे उघड्या मैदानात लढणार होते, लपायला, छापे घालायला जराही संधी नव्हती. स्वतःच्या मनगटातील बळावर कोणत्याही विजयाला खेचून आणणारे मराठे त्या दिवशी उपाशी असून पण आग ओकणार्या तोफांसमोर उभे होते. अशाही परिस्थितीत जो निकराचा लढा मराठ्यांनी दिला त्याने अब्दाली पुरता हादरला. पानिपत च्या या मातीने एकूण ३ लढाया बघितल्या पण शेवटच्या लढाईच्या जखमा या मातीवर अजून आहेत. पानिपत म्हणजे प्रेरणा आहे. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती चे उत्तम उदाहरण आहे .

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 1
पानिपत स्मारक

१० जानेवारी १७६०

युद्धात बंदुकीच्या गोळ्या लागून शरीराची चाळण झालेला दत्ताजी बळ एकवटून उठत होता.इतक्यात त्याच्यावर नजर पडली नाजिबाची आणि त्याने दत्ताजी कडे धाव घेतली. दत्ताजीचे केस हातात धरून डोके वर उचलत विचारले...

"क्यूँ पाटील और लढोगे"

मरणासन्न अवस्थेत दत्ताजी असलेला दत्ताजी १०० हत्तींच बळ याव अशा आवेशात म्हटला 

"क्युं नहीं बचेंगे तो और भी लढेंगे"

उत्तर ऐकून नजीब पिसाळला आणि त्याने दत्ताजीचे मुंडके छाटले, शेजारी असलेल्या गीलच्याच्या हातातील भाला घेतला आणि त्यावर दत्ताजी चे मुंडके खोवले व मैदानात आनंदाने पळत सुटला.

मराठ्यांनी खैबर खिंडीतील पठाणाना दे माय धरणी ठाय केले. नजीबाने ओळखले की मुस्लिम सत्तेचे सार्वभौम केंद्र असणाऱ्या दिल्लीवर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होणार. म्हणून त्याने इस्लामी सत्तेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे  आवाहन दुराणी बादशाह अहमदशहा अब्दाली आणि इतर मुस्लिम बादशहाना  केले. आवाहन कसले ,  त्यांनी इकडे यावे म्हणून अक्षरशः पायघड्या घातल्या. नजीब हा सर्वस्वी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला कारणीभूत होता, आणि दत्ताजी राहिला असता तर नजीबाची भीती पूर्ण झाली असती.

रणमर्द दत्ताजींच्या शौर्या समोर नमन🚩🚩🚩

दत्ताजी शिंदे रणामाजी विद्यं ।

तरीही युद्ध खेळावयासाठी सिद्ध ।।

बचेंगे तो और भी लढेंगे म्हनाला ।

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।

      - संभाजीराव भिडे गुरुजी

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 3
पानिपत वेस

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 5


पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 7
स्मारकाबाहेरील छोटा माहिती फलक

कुंजपुरा:

पानिपत च्या तिसऱ्या युध्दातील अविभाज्य भाग म्हणजे कुंजपूरा येथील किल्ल्यावर मराठ्यांची चढाई.

परिस्थिती अशी होती की, मराठ्यांची मोहीम लांबत गेली, धान्य संपले, अंगावरचे कपडे फाटले. अहमद शहा ने कुंजपुरा च्या किल्ल्यात धान्य व थोडा फार खजाना लपवला होता. कुंजपुरा च्या किल्ल्याची तटबंदी जवळपास २० फूट उंच आणि त्याला एकूण चार दरवाजे होते. मराठ्यांना बातमी लागताच कूंजपुरा वर मराठ्यांनी हल्ला केला. वणगोजी निंबाळकर ने यात आपली तलवार गाजवली. गारद्यांच्या तोफांनी कूंजपुरा च्या तटबंदीला मातीमोल केलं. कुतुबशाह ला मराठ्यांनी मराठी तलवारीचे पाणी पाजले. कुंजापुरा लुटले, थोडी बहुत रसद हाती लागली.

कूंजपुरा किल्यात सध्या किल्ल्याचे अवशेष काहीच शिल्लक नाहीत. 

येथेही मराठा लोकांची वसाहत आहे.

कुंजपुऱ्याची ती गढी बघण्यासाठी मी गेलो आणि गावाच्या सुरवातीलाच एका ज्यूस गाड्यावर गावातील गढीचे अवशेष वगैरे गोष्टींची माहिती विचारली. त्यांच्या माहितीनुसार थोडेफार अवशेष आहेत ते शोधण्यासाठी मी गावात गेलो, अवशेष बघितले आणि परत आलो तर तिथे १०-१५ लोक जमा झाले होते. कारण नव्हत माहीत. पुढे समजल की महाराष्ट्रातून कुणीतरी एकटा मुलगा आला आहे जो गावची माहिती विचारतोय म्हणून ज्यूस वाल्याने गावातील प्रतिष्ठित लोक बोलावले होते.

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 9
पानिपत मधील काही रोड मराठा

इतिहासावर चर्चा सुरू झाली. बोलता बोलता एक ६० च्या घरातील व्यक्ती बोलली जी

              "पेशवा से गलती होवे से"

 त्याला तिथेच थांबवत मी म्हटल  

             "आप के गाव का युद्ध जो आप बडप्पण से बता रहे हैं वो हम मराठोंकी देन हैं" 

पुढे त्यांना सांगितलं की, 


                           "उस समय जो भी निर्णय लिये गये उन परिस्थिती के हिसाब से थे, आज उन  निर्णयो पर सवाल खडे करने की जरुरत नहीं"

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 14
कुंजपुरा मधील काही अवशेष

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 16
कुंजपुरा

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 20
कुंजपुरा

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 22
कुंजपुरा

१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत चे युद्ध घडले.
पानिपत म्हणजे आपणा मराठ्यांसाठी जिव्हाळ्याचा तितकाच भावनिक विषय आहे. महाराष्ट्रात घरात बसून चहाचे घोट घेत मराठे पानिपत मोहिमेत कसे चुकले यावर चर्चा करणे खूप सोपे जाते. 2 दिवस पानिपत व शेजारचा परिसर, ज्या ठिकाणी मराठी फौजांच्या शेवटच्या हालचाली झाल्या तो भाग अभ्यासताना १७६१ ची परिस्थिती किती विचित्र असेल याचा अनुभव आला. दिल्ली, पानिपत , कुंजपुरा कुरुक्षेत्र परत पानिपत या मुख्य हालचाली होत्या. यात मराठे हारले अस म्हणणं तात्विक दृष्ट्या चुकीचं आहे, कारण यांनतर अब्दाली ने मराठ्यांच्या धडाक्याने हिंदुस्थान कडे वाकड्या नजरेने पाहिले नाही.
एकंदर इतिहास घरात बसून अनुभवता नाही येत, पुस्तकी ज्ञानाबरोबरच भौगोलिक अभ्यासही महत्वाचा. हिंदुस्थान वर ज्या ज्यावेळी संकट आले त्या त्या वेळी ते संकट महाराष्ट्राने आपल्या छाताडावर घेतले आहे हा इतिहास आहे. इथल्या लोकांनी ही बोलून दाखवले आमच्या माणसांनी साथ दिली असती तर अहमशहाचे मराठ्यांनी तुकडे तुकडे केले असते.
पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 50


पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 36
पानिपत स्मारकाचा आवार

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 38
पानिपत स्मारकाची भव्य जागा


पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 71
पानिपत युध्दाचे शिल्प

पानिपत पानीपत panipat कुंजपूरा kunjapura 56
पानिपत युद्धाचे शिल्प 

आपण उपहासाने, मज्जेत म्हणतो की अमक्याचे पानिपत झाले. मराठे हरले अस आपण का म्हणतो,मला नाही समजत. जे साध्य करायचं ते केलं, अब्दाली जो पळून गेला तो परत कधीच हिंदुस्थानवर आला नाही. मराठे उत्तरेत अब्दाली ला रोखायला गेले नसते तर भारतमातेचा भगव्या पताका बरोबर चाललेला संसार हिरव्या चांद ताऱ्याबरोबर चालू झाला असता. तीच सौभाग्य मराठ्यांनी वाचवल. अजुन काय हवं आहे. वैचारिकता बदलायला हवी.