Ticker

6/recent/ticker-posts

कार्तिकेय - स्कंद

स्कंद कार्तिकेय सुब्रमण्यम skand Subramanian skand 11
मयुरावर बसलेला कार्तिकेय

स्कंद हा महादेवाच्या परिवारातील महत्वाचा देव आहे. यालाच कार्तिकेय किंवा कुमार अशीही नावे आहेत तसेच हा देवतांचा सेनापती असल्याने याला सेनानी किंवा महासेन म्हटलं जातं. तसेच षडानन, अंगार, सेनानी, देवसेनापती, अग्निभू, व्दादशकर, गुह, गंगा-पुत्र, महासेन, मंगळ , शक्तिधर, सिद्धसेन विशाख इ. नावांनीही त्याचे उल्लेख आढळतात. महादेवाच्या गणांचा अधिपती म्हणून गणेश किंवा गणपती याचा उल्लेख होतो तर कार्तिकेय याचा संबंध युद्धाशी येतो किंवा त्याला युद्धाची देवता देखील मानलं जातं. तारक नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी कार्तिकेयचा जन्म झाला. पार्वतीच्या शापामुळे कार्तिकेय हा नेहमी कुमार म्हणजे बालक रूपातच असतो.

सुब्रह्मण्य भुजंगाष्टका नामक आदी शंकराचार्य लिखित ग्रंथात खालील श्लोक आहे

इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या-ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् |
समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारंहराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् ||
अर्थात
जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारणार्‍या कुमार रूपातील कार्तिकेयाचे मी ध्यान करतो.

स्कंद कार्तिकेय सुब्रमण्यम skand Subramanian skand 13
महादेव परिवार- गणेश, शंकर पार्वती व कार्तिकेय

महाराष्ट्रात खूप कमी मंदिरात मुख्य देवता म्हणून कार्तिकेय पुजला जातो. तो ब्रह्मचारी असल्याने स्त्रियांनी त्याचे दर्शन घेतले तर त्यांना वैधव्य येते असा समज समाजात आहे. दक्षिण भारतात आणि मुख्यत्वे तामिळनाडू मध्ये कार्तिकेयाची पूजा मोठ्या प्रमाणात होते. सुब्रमण्यम स्वामी किंवा मुरुगन या नावाने दक्षिणेत कार्तिकेय प्रसिद्ध आहे. श्रीलंका, मलेशिया, सिंगापुर याठिकाणी देखील स्कंदाची पूजा केली जाते.

जन्माची कथा
सती ही प्रजापती दक्षाची कन्या व महादेवाची पत्नी होती. प्रजापती दक्षाने विराट यज्ञाचे आयोजन केले पण त्यात महादेव आणि सतीला आमंत्रण दिले नाही तरी देखील सती तिथे गेली. प्रजापती दक्षाने सती आणि महादेवाचा अपमान केला म्हणून सतीने योगाग्नी मध्ये आपलं शरीर भस्म केले. अशा प्रकारे पृथ्वीवरून शक्तीचा नाश झाला आणि राक्षसांचा उत्पात वाढला. तारक नावाचा राक्षस देवतांना त्रास देत होता. त्याला वरदान होते की त्याचा मृत्यू फक्त महादेवाच्या मुलाकडून च होईल. सर्व देवांनी मिळून कामदेवाला हिमालयात महादेवाकडे पाठविले कारण सतीच्या मृत्यूने क्रोधित होऊन महादेव तिथे तप करत होते. तपात अडथळा आणला म्हणून महादेवांनी त्याला भस्म केले. इकडे पार्वतीने शिवप्राप्तीसाठी प्रयत्न केले आणि महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीशी विवाह केला. त्यांच्या पासून कार्तिकेय चा जन्म झाला. देवांनी कार्तिकेयला आपला सेनापती बनविला व तारकासुराचा वध केला.

स्कंद कार्तिकेय सुब्रमण्यम skand Subramanian skand 15
कार्तिकेय


कार्तिकेयाची मूर्तरूपे:

१ द्विभुज कार्तिकेय: या रूपातील मूर्तीमध्ये डाव्या हातात, कोंबडा व उजव्या हातात शक्ती असते. 

२ चतुर्भुज कार्तिकेय: अभयमुद्रा, शक्ती, वज्र, कमंडलू कोंबडा, खेटक या गोष्टी विविध क्रमाने येतात.

३ षड्भुज कार्तिकेय: याच्या उजव्या हातात अभयमुद्रा, शक्ती व खड्ग तर डाव्या हातात खेटक, अक्षमाला व कोंबडा असते. 

४ अष्टभुज कार्तिकेय: या रूपातील स्कन्दमूर्तीच्या हातात पद्म, वज्र, शक्ती, अभय, वरद, खड्ग, खेटक आणि पाश किंवा वज्र, शक्ति, अभय, वरद, खड्ग, खेटक, बाण आणि धनुष्य असतात.

५ द्वादशभुज कार्तिकेय : बारा हाताच्या कार्तिकेयाच्या हातात खालीलप्रमाणे आयुध येतात. 

स्कंद कार्तिकेय सुब्रमण्यम skand Subramanian skand 17

कार्तिकेय स्थापना:

कार्तिकेयाची मूर्ती शहरी भागात स्थापन करावयाची असल्यास ती सहा मुख, सहा हात, बारा डोळे व सहा किंवा बारा कानांची असावी व तिच्या हातात शक्ती, खडग, अक्षमाला, अभयमुद्रा, कोंबडा आणि खेटक धारण केलेली असावी.

तसेच गावात किंवा राजवाड्यात मूर्ती स्थापन करायची असेल तर बारा हातांची असावी. तिच्या उजव्या हातात शक्ती, मुसल, खड्ग,चक्र, पाश, अभयमुद्रा व डाव्या हातात वज्र, धनुष, खेटक, शिखिध्वज, अंकुश आणि वरदमुद्रा असावी. 

स्कंद कार्तिकेय सुब्रमण्यम skand Subramanian skand
कार्तिकेय आणि गणेश


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या