Ticker

6/recent/ticker-posts

गोष्ट चोरून केलेल्या हुरड्याची: त्यातून घडलेल्या गमतीदार गोष्टी

कर्नाटक दौरा होता आणि नुकतंच एक कांड करून दुसरं कांड करायच्या तयारीत होतो. रस्त्याने जाताना वाटेत ज्वारीची कणसं दिसली. घरच्या शेतात पाच-पाच एकर ज्वारी आणि मका असला तरी दुसऱ्याच्या रानातील कणसं बघून हुरडा खायचा मोह आवरेना. संध्याकाळची वेळ होती, लग्नं झालेली लोकं घरी जायला निघाली तर म्हातारी-कोतारी रानात च मुक्कामी होती. मग कोण कणसं चोरणार आणि कोण लक्ष ठेवणार यावर चर्चा सुरू झाली शेवटी चोरायची जबाबदारी अभ्या आणि सण्यावर दिली तर लक्ष ठेवायची बडेंवर. मी यात या सगळ्यातून दूर होतो कारण मी चांगल्या घरातला आहे म्हणून नाही तर नुकतंच तुटलेल्या बोटांवर डॉक्टरने इंजेक्शन दिलं होत आणि मी बाहेर आलो तर काही तरी कांड करेन हे सगळ्यांना वाटत असल्याने मला सक्त ताकीद होती काहीही झालं तरी बाहेर यायचं नाही. आमचा सन्या आणि अभ्या गाडीतून उतरले आणि लघवी करतोय असं दाखवत रानात उभे राहिले. कोण बघतय का याचा अंदाज घेत बडे ऊभे राहिले आणि गाडीची डिकी उघडली. बडेंनी इशारा केला आणि पोरांनी कणसांवर ताव मारला. पोरांनी २-३ मिनिटात पिशवी भरून कणसं काढून डिकीत टाकली आणि आम्ही तिथून धूम ठोकली ( वास्तविक पाहता विनंती करून कणसं भेटली असती पण मग तो आमच्या कला-कौशल्यांचा अपमान झाला असता).

रात्री मुक्काम एका ढाब्यावर ठोकला. ढाबामालक राजस्थान चा होता. तो कानडी नसून हिंदी भाषिक आहे हे कारण त्याच्याशी जुळवून घ्यायला पुरेसं होत. कन्नड देशात कुणीतरी बिनबोभाट गप्पा करणारं भेटलं तेही जणू मातीची आपुलकी असलेलं. काही क्षणातच ढाबामालक मित्र बनला (बिचारा ३ वर्षांनंतर आजही अभ्याला कॉल करतो).

मग काय त्याच्या चुलीचा ताबा पोरांनी घेतला आणि त्यावर ज्वारीची कवळी कणसं भाजायला घेतली. मालक आणि कामगार सगळे मागे उभे राहून हसत होते की हे काय करत आहेत.



कणस चोळून हात काळे केले आणि मग हुरड्यावर ताव मारला. इतकं हुरडा खाल्ला की परत जेवणाची गरजच नव्हती. त्यानंतर मग special फर्माईश वर चहा आला आणि त्याच्या साक्षीने कणस कुठून चोरली हे ढाबा मालकाला सांगत ते समस्त विश्व टेन्ट मध्ये झोपी गेले.



सकाळी उठून आवरून निघायचं इतक्यात सन्या म्हणे माझे फोटो काढा. सन्याची होती हाफ चड्डी आणि समोर फोटो काढत होता अभ्या. बडे आणि अभ्याने डोळ्याने एकमेकांना खुणावले आणि नंतर जे झाले ते खूप अश्लील होते ते इथे नको सांगायला. ( एवढं वाचून तुम्ही परत विचारणार हे माहित आहे म्हणून सांगतोच )

अभ्या सन्याला पोज द्यायला सांगत होता. इतक्यात बडे सन्याच्या मागे गेले सन्याची चड्डी खाली ओढली.
सकाळी-सकाळी ढाब्यावरील लोकांनी तसेच आम्ही देखील नको ते दर्शन घेतलं आणि दिवसाची वाट लागली.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या