Ticker

6/recent/ticker-posts

जळके B.A. | B.A. ची पदवी तर मिळाली पण समाजाने यांना नाव दिले जळके B.A.

 

B.A. च्या परीक्षा झाल्या...उत्तरपत्रिका ठेवलेल्या खोलीला आग लागली....त्यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांना पास केले....हे सगळे विद्यार्थी 'जळके बी. ए.' म्हणून ओळखले जाऊ लागले.


प्रकरण पोटापाण्यासाठी नोकरीच असो किंवा लग्नासाठी छोकरीच, त्या अनुषंगाने शिक्षणाची अट आलीच. कोरोना मुळे शिक्षणाची वाट लागली. विद्यार्थ्यांना पुस्तकांची गोडी लागायला हवी तिथं मोबाईल ची लागली. खरं तर यात विद्यार्थ्यांचा दोष नाही आणि प्रशासनाचा देखील नाही. पण भोगावे मात्र विद्यार्थ्यांना लागले. अनेक मोठमोठ्या कंपन्या कामगार भरती करताना कोरोना च्या काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक तळटीप देतात. 

कोरोना बॅच मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये.

शाळा आणि महाविद्यालये यांना दणका बसावा आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना देखील अशी ही काही पहिली घटना नाही. परीक्षेच्या आधी पेपर फुटणे, मास्तरांनी सगळा पेपर लिहून देणे किंवा पैसे देऊन पास होणे या गोष्टी शिक्षण जगतात नेहमी घडतात. याच पार्श्वभूमीवर 'जळके बीए' ही उपाधी धारण करणारे काही विद्यार्थी होऊन गेले.



१९३५ सालच्या आसपास एका वर्षी मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या बी.ए.च्या परीक्षेच्या एका विषयाच्या उत्तरपत्रिका आगीत जळून खाक झाल्या; त्याचा गवगवा नको म्हणून विद्यापीठाने सर्वच परीक्षार्थीना उत्तीर्ण करायचे ठरवले; पण ही बातमी बाहेर फुटलीच आणि त्या वर्षी बी.ए. पास झालेल्या विद्यार्थ्यांना कुचेष्टेने जळके बी.ए. म्हटले जाऊ लागले.

आता या उत्तरपत्रिका आपोआप जळाल्या की त्या जाळल्या गेल्या हे एक कोड आहे. कारण अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या जाळल्या ही देखील अफवा त्यावेळी होती. या प्रकरणात जे जे विद्यार्थी पास झाले त्यांना जळके बी.ए. ही पदवी वजा भळभळती जखम आयुष्यभर मिरवावी लागली. समाजात आणि व्यावहारिक जगतात त्यांची अक्षरशः 'जळके बी.ए.' म्हणून हेटाळणी होऊ लागली. आता corona बॅच ची जी गत आहे असे च या लोकांची होती. नोकरीसाठी जागा निघाल्या की त्यात तळटीप ठरलेली असायची

जळक्या बी.एं.नी अप्लाय करु नये..!

याच धर्तीवर एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेस मधील खासदारांना 'रडके खासदार' म्हटले गेले होते. भाजपा आणि शेतकरी संघटना यांच्या जोरदार विरोधामुळे काँग्रेसचे खूपच कमी खासदार निवडून आले. रडतखडत थोडे च उमेदवार खासदार झाले होते म्हणून यांना 'रडके खासदार' ही उपाधी दिली गेली.

असो....


जळके B.A., jalake BA JALAKE B.A.  जळके BA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या