Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीचे पटवर्धन | पुण्यात शनिवार वाड्याच्या दक्षिणेला पटवर्धनांचा वाडा होता

सांगलीचे पटवर्धन


१६७२ मध्ये शिवरायांनी मिरज जिंकले आणि आपले वर्चस्व या भागावर प्रस्थापित केले.पेशवाईत इंद्रोजी कदम हे सांगली मिरज या भागाचे सरदार होते.  याच कदम सरदाराकडे गोविंद हरी हे फडणवीसी करू लागले. पटवर्धनांचा मूळ पुरुष हरभट पटवर्धन हा होता.इचलकरंजी कर घोरपडे यांच्या कडे हा उपाध्ये म्हणून होता. 


सांगलीचे पटवर्धन


१७१६ साली तो बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना भेटला. याला एकूण सात मुले.कदम हे निपुत्रिक होते जेंव्हा दिल्लीच्या मोहिमेत इन्द्रोजी कदम कामी आले तेंव्हा त्यांच्या पागेची सरदारकी गोविंद हरी यांना देण्यात आली.१७४५ मधील पेशवे विरूध्द ताराबाई ,दमाजी गायकवाड या युध्दात  गोविंदहरी व त्याचा मुलगा गोपाळराव यांनी मर्दुमकी गाजवून दमाजिला कैद केले. येथून पुढे पटवर्धन सरदार नावारूपाला आले.१७६० मध्ये गोपाळराव याने दौलताबाद  निजमाकडून घेतला.करवीरकरांचा बंदोबस्त करण्यासाठी पटवर्धनांना मिरज येथे नेमण्यात आले.गोपाळराव, रामचंद्र राव, परशुरामभाऊ, चिंतामणराव यांनी विशेष पराक्रम गाजवला. गोविंद हरी यांनी आपल्या वडिलांच्या स्मारकासाठी हरिपूर गाव वसवले. हरिपूर त्यावेळी सांगली पेक्षा मोठे होते.१७७१ साली गोविंद हरी निधन पावले व मिरज प्रांत वामनराव पटवर्धन यांच्या कडे आला पण १७७६ मध्ये खानदेशात ते देखील  निधन पावले म्हणून पांडुरंग गोविंद पटवर्धन यांच्या कडे मिरज प्रांत सोपवला. त्यानंतर हरिहर पांडुरंग व चिंतामणराव आप्पासाहेब यांना सरदारकीची वस्त्रे मिळाली. दुसऱ्या बाजीरावाने पटवर्धन घराण्यातील मिरज जहागिरी च्या वाटनीला परवानगी दिली, सांगली राजधानी झाली, गणेशदुर्गाची बांधणी झाली, गणपती मंदिर बांधले, सांगलीत पेठा वसवल्या. पटवर्धन व इंग्रज यांचे चांगले  संबंध पाहून दुसऱ्या बाजीरावाने सर्व पटवर्धनांवर हत्यार उचलले व जहागिरी जप्त करण्याचे आदेश दिले. पण अल्पिष्टन साहेबाच्या मध्यस्ती ने जप्ती रद्द झाली. पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजांनी पटावर्धनांशी तह केले व त्यांना नोकरी करण्याचा प्रस्ताव दिला पण  मी नोकरी करणार नाही असे सांगून चिंतामणराव पटवर्धन यांनी १ लाख ३८, हजार ९९५ रुपयांचा प्रदेश इंग्रजांना दिला.
                    ६० वर्षे पटवर्धन घराण्याचा उत्कर्षाचा काळ होता. पेशवाई नष्ट झाली तस पटवर्धन घराण्याचा तेजही कमी झाले. पण पेशवाईत या घराण्याने खूप नाव कमावले. पुण्यात शनिवार वाड्याच्या दक्षिणेला पटवर्धनांचा वाडा होता. पटवर्धनांचा प्रतिनिधी नेहमी पेशव्यांच्या बरोबर असे. पेशवे दरबारात होणाऱ्या सर्व घटना तो पटवर्धन यांना लिहून कळवित. हे सर्व बाड मिरज मळ्यात आहेत. पेशवे दरबारातील तसेच मोहिमा मधील खूप गोष्टी या कागदपत्रांतून समजतात. ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेव खरे यांनी या कागदाचे लिप्यंतर करून त्याचे खंड प्रकाशित केले.
----- ओँकार खंडोजी तोडकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या