Ticker

6/recent/ticker-posts

अक्षीचा मराठी शिलालेख | शके ९३४ म्हणजेच मधील असून "मराठीतील पहिला शिलालेख

अक्षीचा पहिला शिलालेख / गधेगळ:

शके ९३४ म्हणजेच मधील असून "मराठीतील पहिला शिलालेख 


रायगड जिल्ह्यातील अलिबाग-चौल रस्त्यावर अक्षी नावाचं एक छोट गाव आहे. या गावात दोन गधेगळ वजा शिलालेख आहेत.  इतकी वर्ष ऊन वारा पाऊस खाल्ल्याने शिलालेख इतके अस्पष्ट आहेत की काहीच अक्षर ओळखु येत नाहीत.
हा लेख अक्षी मधील कालिका मंदिराजवळ असून शके ९३४ म्हणजेच इसवी १०१२ मधीील असून "मराठीतील पहिला शिलालेख कोणता"? या स्पर्धेत हा देखील आहे.






सर्वात वर चंद्र सूर्य कोरले आहेत त्याखाली लेख व त्याच्या खाली स्त्रीचा प्राण्या बरोबर संभोग दाखवला आहे.
शिलालेखवरील ओळी:-
गीं सुष संतु । स्वस्ति ओं । 
पसीमस-मुद्राधिपती । स्री कोंकणा चक्री- वर्ती । 
स्री केसीदेवराय । महाप्रधा- न भईर्जू सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने ।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु । भईजुवे तथा बोडणा तथा नऊ
कुवली अधोर्यु प्रधानु । 
महलषु- मीची वआण । लुनया कचली ज-

अर्थात-
जगी सुख नांदो.पश्चिम समुद्राधिपती श्री कोकणचक्रवर्ती, श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भइर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. लुनया कचली

तर वरील लेखानुसार सर्वप्रथम विश्वाचे कल्याण होवो अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर दिलेल्या दानाचा व काळाचा उल्लेख आहे. सगळ्यात खाली दाखवलीले शिल्प हे शापवचन निर्देशित करत आहे. दिलेले दान आकाशात सूर्य चंद्र असेपर्यंत चालू राहावे आणि त्याचा जर कुणी गैरवापर केला किंवा इतर कुणी उपभोगण्याचा  प्रयत्न केला तर शेवटी दाखवला तसा शाप राहील. (अशा प्राणी आणि स्त्रीच्या संभोग शिल्पविषयी पुढील लेखात उदाहरणासह माहिती येईल. )

पश्चिमसमुद्राधीपती व कोकणचक्रवर्ती अशी दोन बिरूद धारण करणारा द्वितीय केसिदेव याच्या अंमल इथे असल्याचे दिसते आणि त्याच्या प्रधानाने हा दान दिल्याचे नमूद केले आहे. .
हे शिलालेख अस्सल साधने आहेत जी इतिहासात अंतर्भूत व्हायला भाग पाडतात. अज्ञानामुळे अशी साधन आमच्या आधीच्या पिढीने घराच्या पायात घातली.

अक्षीचा दुसरा शिलालेख/ गधेगळ:






शापवचन लिखित असणारी ही गधेगळ वजा लेख अक्षी मधील सोमेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला उभा आहे. शिलालेख १५ ओळींचा असून यादव घराण्यातील रामचंद्रदेव याच्या काळातील आहे.
सर्वात वर चंद्र सूर्य कोरले असून त्याखाली लेख व त्याच्या खाली स्त्रीचा प्राण्या बरोबर संभोग दाखवला आहे. हा शके १२१३ म्हणजेच इसवी सन १२९१ मधील आहे.

लेखावरील ओळी:
स्री सकु १२१३ खर संवछारे चैत्र सुध
८ सुक्रे अद्येह स्रीमत्प्रौढिप्रतापचक्र –
वर्त्ति स्रीरामचंद्रदेव विजयोदयी तत्पा –
दपद्मोपजीवी स्रीजाइदेव – – तेहाचे स्री – इ
स्वरदेव क्षत्रिय ————————–
त्रींबकानी स्री अक्षी का(लि)कादेवी –
ब्राम्हणासि प्रदेसु ————- पुत्रें दत्त मा –
गे तेआ ग १ ————————–
——————————————
पुर्वे | पस्मे —————————-
——————————————
——————————————
———————————- हें जो
लोपी तेहाचीये माएसी गाढौ घोडु झविजे
———————————- सुभं भवतु |

.
अर्थात
श्रीशके १२१३ खर संवत्सर चैत्र शुध्द ८ शुक्रवार या दिवशी श्रीमत्प्रौढप्रतापचक्रवर्ती श्रीरामचंद्रदेव याची राजवट असताना त्याचा पादपद्मोजीवि श्रीजाईदेव याचा (मुलगा?) श्रीईश्वरदेव क्षत्रिय याने अक्षी  कालिकादेवी ब्राम्हणास जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पूर्वे व पस्मे या शब्दावरून त्या जमिनीच्या सीमांचा उल्लेख असावा. हे दान जो कोणी नष्ट करेल किंवा इतर कोणी उपभोगेल त्याच्या आईस गाढव व घोडा लागतील (झवतील). शुभं भवतु.


.
गद्धेगळ विषयी थोडक्यात:-
शापाशिर्वादात्मक वचने अथवा तशी चित्रे कोरण्याचा प्रघात आधी पासून दिसतो. यात दिलेल्या शिवी वजा शापामुळे लोक दिलेल्या दानाचा अनादर करत नव्हते.
काही ठिकाणी फक्त चित्र आढळते तर काही ठिकाणी चित्रासह शापवचन देखील. शापवचने विविध प्रकारची असतात. जसं की काही ठिकाणी देवदेवतांच्या शपथा दिलेल्या असतात तर कुठे गाई व ब्राम्हण हत्येचे पाप लागेल असे असते, आई वडील किंवा लहान मुलाच्या हत्येचा दोष लागेल, नरकप्राप्ती होईल असे उल्लेख येतात.
काही उदाहरणे:
१. ......तस्यां माता गाढभेनं
२. .......षष्ठी वर्षसहस्त्रणी विष्ठाये जायते कृमी
३. ....... श्री गिरिजा देवीची आण
४. .... तेआची माये गर्धभे झविजे

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. मी मराठी... अप्रतिम अशी माहिती... धन्यवाद ..!!

    उत्तर द्याहटवा
  2. पहिल्यांदाच मी आपले विविध लेख मी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने वाचले आणि शास्त्रशुद्ध माहिती वाचून आपल्या प्रेमातच पडलो. शिल्प, ऐतिहासिक,अनुग्रह मुर्ती, अक्षीचा मराठी शिलालेख, गद्धेगळ इ लेख अभ्यासपूर्ण आहेत. अन्य पोस्ट वाचल्या नसल्याचे उल्लेख केला नाही. जरुर वाचून अभिप्राय देईन . आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा व धन्यवाद! 💐💐🙏

    उत्तर द्याहटवा