अनुग्रह म्हणजे एखादे वरदान प्राप्त होणे. गजासुर अंधकासुर यांच्याशी संबधित मूर्तींना संहार मूर्ती म्हणतात तर ज्या शिल्पात वरदान अथवा आशीर्वाद प्राप्ती झाली त्यांना अनुग्रह मूर्ती म्हटले जाते. यांची माहिती लिखित आढळत नाही पण कथा आणि शिल्प मात्र काही ठिकाणी अवश्य पाहायला मिळतात.
रावणानुग्रह -
सदरची शिल्प होयासाळ साम्राज्यातील आहेत. आपण पाहू शकतो की रावण आपली पूर्ण ताकद लावून कैलास पर्वत उचलत आहे. कैलासा वरील वनस्पती, प्राणिमात्र भयभीत झाले आहेत इतकंच काय तर कैलास पर्वताच्या कंपामुळे पार्वती देखील घाबरली आणि एका बाजूला तिचा तोल गेलेला दिसत आहे. त्याच क्षणी महादेवांनी पार्वतीला घट्ट पकडले आहे व धीर देत आहेत. हा सर्व प्रकार आकाशातून सर्व देवता पाहत आहे असं देखील शिल्पात दिसत आहे.
याची कथा पाहून पुढचा अंदाज येईल. तर झालं असं रावणाने कुबेराचा पराभव केला आणि कुबेराचे विमान घेऊन तो परतत असताना त्याचे विमान कैलास पर्वतावर थांबले ते महादेवाच्या दर्शनासाठी. पण दर्शन मिळाले नाही म्हणून देवलोकावर विजय मिळवलेला रावण चिडला, आणि त्याने कैलास पर्वत उचलिला. या मुळे पार्वती घाबरली म्हणून शंकराने फक्त आपल्या अंगठ्याने कैलास पर्वत खाली दाबला. रावण कैलासाखाली सापडला मग रावणाच्या प्रार्थनेवरून महादेवांनी त्याला माफ केले आणि अशा प्रकारे रावणाने महादेवाचा अनुग्रह प्राप्त केला. असं म्हटलं की रावणाने शिव तांडव स्त्रोत्र म्हणून अनुग्रह प्राप्त केला.
![]() |
| रावणानुग्रह |
![]() |
| रावणानुग्रह |
![]() |
| रावणानुग्रह |
खाली दिलेले कर्नाटकातील पटदक्कल मधील आहे. या शिल्पात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कैलास पर्वत उचलणारा रावण पाठमोरा दाखविला आहे.
![]() |
| रावणानुग्रह |
शिल्पात दहा तोंडाचा रावण दिसतो आहे जो आपल्या हातांनी कैलास पर्वत उचलत आहे. त्याचा एक हात कमरेवरील तलवारीच्या मुठीवर आहे तर इतर १९ हात पर्वत उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. कैलास पर्वतावर महादेव आणि पार्वती दोघेही सुखासनात बसले आहेत व पाठीमागे नंदी आहे. पार्वतीचा पाय अधांतरी आहे तर महादेव आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्वतावर महादेवाचे गण असून माकड, हत्ती असे प्राणी देखील आहेत.
![]() |
| रावणानुग्रह |
अनुग्रह मूर्ती भाग २
सदरची मूर्ती ही अनुग्रह आणि संहार दोन्ही प्रकारात मोडते. मार्कंडेय याला अनुग्रह मिळाला म्हणून अनुग्रह मूर्ती तर काल रुपी यमाचे पारिपत्य केले म्हणून संहार मूर्ती. पुढे कथा वाचून एक अनुभूती नक्की येईल की शिवाची भक्ती केली तर काल रुपी यमाला पण तुम्ही परतवून लाऊ शकता.
मार्कंडेयानुग्रह / कालारी मूर्ती
सदरच शिल्प शृंगेरी येथील विद्याशंकर मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल आहे. मार्कंडेय हा शिवलिंगाशेजारी उभा आहे. शिवलिंगातून स्वतः भगवान शंकर बाहेर आले आहेत व त्यांनी समोर उभ्या असणाऱ्या यमाच्या छातीवर आपल्या उजव्या पायाने लाथ मारली आहे. उजव्या हातातील त्रिशूळ यमावर उगारले असून डाव्या हातात डमरू आहे तर खालील उजवा हात अधोमुख सुचीमुद्रेत आहे. डोक्यावर मुकुट, कमरेवर कटीसुत्रा इतकच काय ते अलंकार पण मूर्ती त्यातही सुंदर दिसते.
![]() |
| मार्कंडेयानुग्रह / कालारी मूर्ती |
आता याची कथा काय आहे ते पाहू. मर्कंड नावाच्या ऋषींना भगवान शंकरांच्या वरदानाने मुलगा झाला त्याच नाव मार्कंडेय. हा मुलगा अतिशय गुणवान,हुशार होताच पण अल्पायुषी देखील होता. सोळाव्या वर्षी त्याचा मृत्यू होणार हे विधिलिखित असत. मार्कंडेय शिवाच्या भक्तीत दंग होऊन जातो. त्याचवेळी यम तिथे येतो व मार्कंडेय याला आपल्या यमपाशात गुंडाळतो. महादेवाला हे सहन नाही होत म्हणून महादेव स्वतः लींगातून प्रकट होतात आणि यमाला दूर लोटतात. यम आपल्या प्राणाची भिक मागून निघून जातो आणि अशा रीतीने मार्कंडेय याचा मृत्यू ओढवला असताना देखील त्याचा जीव वाचतो. इथ आपणाला समजत की महादेवाला मृत्युंजय का म्हणतात.
अनुग्रह मूर्ती भाग ३
सदरच्या शिल्पात एक व्यक्ती हातात धनुष्य बाण घेऊन उभी असल्याचे दिसते. त्याने शिवलिंगाला पाय लावला आहे. हातात एक बाण आहे जो त्याने स्वतःच्या डोळ्याला लावला आहे.
या संदर्भात एक कथा दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. कन्न नावाचा एक शिवभक्त होता जो शिकरीवरून आला की आपल्या धनुष्य बाणासह तो महादेवासमोर जात आणि पूजा करून महादेवाला मांसाचा नैवैद्य दाखवित. हा सर्व प्रकार खूप दिवस चालू होता. एकदा महादेवांनी परीक्षा घेण्याचे ठरवले. कन्न शिकारीवरून आला आणि पूजा करत असताना महादेवाच्या दोन्ही डोळ्यातून रक्त येऊ लागले. त्याच क्षणी कन्नाने जवळच्या बाणाने स्वतःचा डोळा काढला आणि महादेवाच्या डोळ्याच्या जागी बसविला. त्याने आपला दुसरा डोळा देखील काढला पण नक्की कुठे बसवायचा हे समजेना म्हणून कन्नाने पायाच्या अंगठ्याने महादेवाच्या डोळ्यातील रक्त थांबविले. महादेव खुश झाले आणि त्यांनी कन्नाला दर्शन देऊन दृष्टी दिली तसेच कैलासात अढळ स्थान दिले.
अशीच एक कथा विष्णु बाबतीत आहे ज्याला विष्णवनुग्रह अस म्हणतात.
कन्ना च्या बाबतीत अजून एक कथा आहे. कन्नाची पूजा पाहून एक साधू त्याचा मत्सर करीत असे. जिथं पूजा चाले ते मंदिर अचानक खचू लागले तेंव्हा तो साधू पळून गेला पण कन्नाने मंदिराचा पडणारा भाग अंगावर तोलून धरला. अस नाट्य घडवून शिवाने खरं भक्त कोण आन खोटं याची सिध्दत्ता करून घेतली.
Idol of grace-
Grace is a gift. The idols associated with Gajasur Andhakasur are called Sanhar idols, while the sculptures in which boons or blessings are received are called grace idols. Information about them is not found in writing but stories and sculptures can be seen in some places.
Ravananugraha(Ravana receiving grace) -
The sculptures belong to the Hoysala Empire. We can see that Ravana is lifting Mount Kailash with all his strength. The plants and animals on Kailasa are so frightened that Parvati is also frightened by the tremors of Mount Kailasa and seems to have lost her balance on one side. At that moment, Mahadev is holding Parvati tight and giving her patience. The sculpture also shows that all these deities are seen from the sky.
The next guess will come from the story. So it happened that Ravana defeated Kubera and while he was returning with Kubera's plane, his plane stopped at Mount Kailash to pay homage to Lord Mahadev. But Ravana, who had conquered Devaloka, got angry because he did not get Darshan, and he climbed Mount Kailash. This frightened Parvati so Shankara just pressed his thumb down Mount Kailash. Ravana was found under Kailasa then Mahadev forgave him from Ravana's prayer and thus Ravana received Mahadev's grace.
Grace Idol Part 2: -
The idol falls into both grace and destruction. The idol of grace as Markandey got grace and the idol of destruction as he killed Yama. After reading the story, you will definitely get the feeling that if you worship Shiva, you can defeat Yama in the form of death.
Markandeyanugraha / Kalari idol: -
This sculpture is carved on the exterior of Vidyashankar temple at Sringeri. Markandey is standing next to Shivlinga. Lord Shiva himself has come out of the Shivling and he has kicked Yama's chest standing in front of him with his right foot. The trident in the right hand is raised on the yama, the left hand is holding the damru, while the lower right hand is in the downward direction. The crown is on the head, the chain is on the waist, the idol is beautiful.
Now let's see what the story is. A sage named Markande had a son by the gift of Lord Shiva, the same name Markandey. This boy was very talented, smart but also short-lived. It was ordained that he would die at the age of sixteen. Markandey is stunned by the devotion to Shiva. At the same time Yama arrives and wraps Markandey in his Yamapasha. Mahadev himself does not tolerate this so Mahadev himself appears from the linga and throws Yama away. Yama goes after the beggar of his life and thus saves his life even when Markandey is dragged to his death. Here we understand why Mahadev is called Mrityunjaya.
Grace Idol part 3:
In this sculpture, a person is seen standing with a bow and arrow in his hand. He has set foot on Shivlinga. He has an arrow in his hand that he has put in his own eye.
A story in this regard is famous in South India. There was a devotee of Shiva named Kanna who came hunting with his bow and arrow. It all kind of went on for days. Once Mahadev decided to take the exam. Kanna came from the hunter and while performing pooja, blood started coming from both the eyes of Mahadev. At that moment, Kanna drew her own eye with a nearby arrow and placed it in the place of Mahadev's eye. He also removed his other eye but not knowing exactly where to place it, Kanna stopped the blood in Mahadev's eye with his toe. Mahadev was pleased and gave a darshan to Kanna and gave him a firm place in Kailasa.
There is a similar story in the case of Vishnu which is called Vishnavanugraha.
There is another story in Kanna's case. Seeing Kanna's worship, a sadhu was jealous of him. The monk fled when the temple where the pooja was being held suddenly ran away but Kanna weighed the falling part of the temple on his body. By making such a play, Shiva proved who is a true devotee and who is a liar.











0 टिप्पण्या