Ticker

6/recent/ticker-posts

बेलापूर: साष्टी चा किल्ला

आज जितकं महत्त्व मुंबईला आहे तितकंच महत्त्व इतिहास काळात होत हे सतत जाणवत. मुंबईच्या आजूबाजूला किल्ल्यांची माळ गुंफली आहे. आपल्या पेक्षा परकियांनी मुंबई ला जास्त महत्त्व दिलं. वसई पासून ते झाली अलिबाग पर्यंत किनारपट्टी पोर्तुगिजांनी ताब्यात ठेवली . त्याच पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्यापिकी एक किल्ला म्हणजे साष्टी चा किल्ला.

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort
बेलापूर किल्ल्यातील बुरुज

पनवेलची खाडी, ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर गाव वसलेल आहे. मुख्यत्वे कोळ्यांची वस्ती असलेल्या गावात पोर्तुगिजांनी किल्ला बांधला, तो म्हणजे बेलापूरचा किल्ला. वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणार्‍या वाहातूकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलिकडील मराठ्यांकडून होणार्‍या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी बेलापूरचा किल्ला बांधला.

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort
बुरुजाच्या आतील भाग

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort
बुरुज

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort
मोडकळीस आलेल्या पायऱ्या

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort
आतून बुरुज


इतिहास :

पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला; पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort
रस्त्यालगत असणारी ईमारत

बेलापूर साष्टी किल्ला belapur sashti fort
वरील ईमारत आतून


पाहण्याची ठिकाणे :

नवी मुंबई महानगरपालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याचा एकूलता एक बुरुज उभा आहे. बुरुजाच्यावर जाण्यासाठी आतल्या बाजूने गोलाकार जिना आहे. किल्ल्याची तटबंदी अस्तित्वात नाही, पण बालेकिल्ल्यावर इमारतीचे अवशेष व दुमजली गोल मनोरा दिसतो. किल्ल्याची देवी गोवर्धनी मातेचे जिर्णोध्दार केलेल मंदिर सध्या इमारतींच्या गराड्यात आहे. या शिवाय रेतीबंदर जवळ दोन चौकोनी विहीरी व पोर्तुगिजकालीन तलाव आहे.


किल्ला खूप धोक्यात आहे. याच्या इमारती शेजारी काँक्रिट च जंगल वाढत आहे. त्यामुळं अजून काही दिवसात या किल्ल्याची संपूर्ण जागा कुणी तरी विकत घेऊन त्याजागी मोठी इमारत उभी राहिली तर आश्चर्य वाटू नये. किल्ले समोर डोळ्यांना दिसतात भले ते आज ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत त्याच संरक्षण व्हावं नाही तर इतिहासाची परिस्थिती खूप वाईट असेल

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या