चौल हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेलं गाव आहे. चौलमध्ये भटकायला लागलो की, गावातले लोक सर्वप्रथम रामेश्वर मंदिरात घेऊन येतात. चौलचे हे ग्रामदैवत! उतरत्या कौलारू छताचे मंदिर, समोरच नंदीमंडप, दिपमाळ आणि रेखीव पुष्करणी! कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना! मूळ मंदिराची निर्मिती कधी-कोणी केली याची माहिती मिळत नाही, पण नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात. या मंदिरातील अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे इथले कुंड. या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली तीन कुंडे आहेत. पर्जन्य, वायू आणि अग्नी अशी त्यांची नावे आहेत. दुष्काळ पडला की, ‘पर्जन्य’, वारा जोराचा वाहू लागला की ‘वायू’ आणि थंडीचा जोर वाढला की, ‘अग्नी’ कुंड उघडायचे. मग त्या-त्या गोष्टींची उणीव या कुंडातून भरून निघते. सदर गोष्टीच्या नोंदी पडताळून पाहिल्या तर पाऊस लांबल्याने आजवर यातील पर्जन्य कुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडले होते आणि त्या-त्या वेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते. चौलमध्ये रामेश्वर मंदिराशिवाय इतरही मंदिरे आहेत. जसं की एकवीरा भगवती देवीचे मंदिर आहे ज्याच्या गर्भगृहाच्या दरवाजावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे उल्लेख आहे ज्यात हे  काम शके १६७६ (इसवी सन १७५२) मध्ये केल्याचा एक संस्कृत लेख आहे.

रामेश्वर मंदीर, चौल
रामेश्वर मंदीर, चौल

चौल हे महत्वाचे बंदर होते ज्याचा उल्लेख 'पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी' या कागदात अगदी सुमारे 2,500 वर्षांपासून आढळतो.  टॉलेमीच्या दस्तावेजात या सातवाहनकालीन बंदराचा उल्लेख येतो त्यामुळे आज माहित नसलेलं 'चौल' हे बंदर त्याकाळी व्यापाराच्या दृष्टीने किती महत्त्वाचे होते याची प्रचिती येते. वाघजाईच्या डोंगरात असणाऱ्या सातवाहन कालीन लेण्या या भागाचे प्राचीनत्व सिद्ध करतात.

या

रामेश्वर मंदीर, चौल
रामेश्वर मंदीर, चौल

रामेश्वर मंदीर, चौल
मंदिराचा सभामंडप




रामेश्वर मंदिर चौल Rameshwar temple chaul
मुख्य शिवलिंग


चौल रेवदंडा या नावाने ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. रेवदंडा आज जरी मोठं असल तरी त्याची निर्मिती चौल पासूनच झाली असल्याने त्याचा उल्लेख चौल रेवदंडा असाच होतो. पुराणात गेलो तर 'चौल' चे नाव 'चंपावती ', तर रेवदंड्याचे नाव 'रेवती' असे आढळते, पण 'चौल' या नगरीचे पौराणिक नावांशिवाय' चेमुल '' तिमुल '' सिमुल '' सेमुल्ल '' सिबोर '' चिमोलो '' सैमूर '' जयमूर '' चेमुली '' चिवील '' शिऊल '' चिवल '' खौल '' चावोल '' चौले 'आणि आता 'चौल'अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे.