अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर जिथं वास करतो त्या पाली गावाच्या मागे सरसगड उभा आहे. गणेशाचं दर्शन घेऊन मस्त गडफेरी होते. मातीच्या ढिगारा रचावा आणि त्यावर दोन दगड ठेवावेत अशी काहीशी गडाची भौगोलिक रचना.
![]() |
सरसगड |
![]() |
सरसगड पायऱ्या |
एकंदर गडाचा पसारा कमीच आहे. खालचा भाग चढून गेलं की महाकाय पाषाण लागतो. याच्या बरोबर मधुन दीड ते दोन फूट उंची असणाऱ्या आणि दमछाक करणाऱ्या एकूण ९६ पायऱ्या चढव्या लागतात तेंव्हा आपण दिंडी दरवाजात पोचतो
दिंडी दरवाजा चा जवळ जवळ ७०% भाग याच पाषाणात खोदून तयार केला आहे. याच्या आता पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. इथून वर गेलं की आपण किल्ल्यात पोचतो. उजवी कडे सरळ तटबंदी वरून चालत गेलं की बालेकिल्ल्याच्या पायथ्याला पोचतो.
सरसगडवरील पाण्याचे व्यवस्थापन
![]() |
पाण्याचे टाके |
बालेकिल्ल्याचा अख्खा पाषाण तळातून खोदून त्यात पाण्याची टाकी , कोठारे आणि खोल्या तयार केल्या आहेत. आज्ञापत्रात जलव्यवस्थापन विषयी म्हटले आहे की "तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरीच निश्चिंती न मानावी, उद्योग करावा, की निमित्त की झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे पाणी म्हणून दोनचार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे". सरसगड वर प्रचंड प्रमाणात पाणी साथ होईल इतकी टाकी खोदली आहेत.
बालेकिल्ला
बालेकिल्ल्याला वळसा घालून आपण परत बालेकिल्ल्यावर जायचं. बालेकिल्ल्यावर सध्या काहीच शिल्लक नाही. फक्त एक मंदिर आणि तलाव आहे. एखाद्या इमारतीचं जोत नजरेस पडत इतकाच काय ते बालेकिल्ल्यावर शिल्लक आहे. येथील मंदिरात असणाऱ्या मंदिराच्या अवशेषांवरून अस दिसत की पूर्वीच इथलं मंदिर सुंदर असेल. २ खांबाचे अवशेष आहेत पण खूप सुंदर आणि विशिष्ट आहेत.
![]() |
बालेकिल्ल्यावरील महादेवाचे मंदिर |
बालेकिल्ल्याला वळसा घालताना पाठी मागील बाजूस दोन दरवाजे आहेत पैकी एक मुख्य तर दुसरा चोर दरवाजा आहे. मुख्य दरवाज्यावर छान शिल्प आहे. मध्ये कलश आणि दोन्ही बाजूस फुले.
1 टिप्पण्या
खूपच सुंदर वर्णन केले आहे धन्यवाद तुमच्या blog मुळे आम्हाला प्रेरणा मिळते
उत्तर द्याहटवा