भाग १ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
मोडलेली दोन बोटे घेऊन केलेला हंपी दौरा
भाग २ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
कर्नाटकात चोरी करून केलेली हुर्डा पार्टी
......सन्याची चड्डी काढली खरी पण त्याची सजा इतकी मोठी मिळेल असा विचार केला नव्हता. गीतेमध्ये च काय पण इतर ग्रंथात देखील सांगितलं आहे की आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच भोगून जायची आहेत पण ती फळं इतकी instantly मिळतात याची कल्पना चुकून पण मनात नाही आली. म्हणून सांगतो picture अभी बाकी है मेरे दोस्त.....
सूर्योदय |
ढाब्यावरून हंपीच्या दिशेने निघालो आणि एके ठिकाणी थांबून मस्त सूर्योदय बघत फोटो काढले. पुढे एक toll दिला आणि लगेच service रोड घ्यावा लागला. फक्त 300-400 मीटर साठी toll दिल्याने एक तीव्र सनक डोक्यात गेली आणि भ पासून सुरू होणारे अलंकारीक शब्दांची मुक्तकंठाने उधळण toll मालकाच्या आणि कर्नाटक सरकारच्या नावाने सगळ्यांनी केली.
हंपी मध्ये गेल्या-गेल्या लगेच एका ठिकाणी नाष्टा करण्यासाठी थांबलो.
अम्मा आणि अभ्या |
बोटांची वाट लागल्याने मी गरीब गाईसारखा गप गाडीत बसलो आणि उसनवार आणलेल्या मित्राच्या GoPro कॅमेऱ्यात बडे selfie घेण्यात गुंतले. मला पण सेल्फी मध्ये यायचं होत.
आता माझ्या अंगात काय किडे वळवळले नाही माहित आणि मी गाडीचा दरवाजा उजव्या बाजूने उघडला.
एक आठ ते नऊ वर्षाचं मुल मस्त गाणी म्हणत, उड्या मारत शाळेला चाललं होतं. दरवाजा चार बोट उघडला असेल आणि ते येऊन दरवाजाला धा~~ड्~कन थडकले. त्याने डोळ्याला हात लावला आणि जे काही ट्टयां~~व~~ केलं ते ऐकायला तयार होईना. माझ्या डाव्या हाताच्या बोटांचे तुकडे पडले होते त्यात मी एका हाताने कसं तरी लेकराला धरलं आणि normal मार लागला असेल म्हणून बघितलं तर भुवईत अक्षरशः खोच पडली होती आणि रक्त थांबायचं नाव घेत नव्हत. त्यात पण बडेने एक फोटो काढलाच.
मुलाच्या बाजूला आम्ही चौघे थांबलो, डेटॉल लाऊन जखम साफ केली आणि त्यावर band aid लाऊन त्याला शांत केलं. इतक्यात लुंगी खाली सोडून रस्त्याने जाणाऱ्या लोकांनीं आपापल्या लुंग्या वर केल्या होत्या आणि आमच्याकडे येत होते. South Indian सिनेमा सारखं फक्त पाठीमागून कोयते काढायचे बाकी होते. त्यात आमचा सन्या नको ते बोलून गावातल्या लोकांनी आम्हाला कसं माराव याच्या idea देत होता. हळूच त्याच्या पायावर मारून मारून त्याला गप्प बसविला.
दुसऱ्या गावात असा काही किस्सा घडला तर लोक बाकीच्या गोष्टी सोडून मारायला धावतात. मुलाचे वडील रस्त्याने जात होते, त्यांना सर्व प्रकार सांगितला आणि त्यांची रीतसर माफी मागितली. चूक नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माफ केलं. जवळ जे काही पैसे होते ते सगळे काढून त्यांना दिले आणि मुलाला त्यांच्या ताब्यात देऊन जो काही पळ काढला ते परत त्या रस्त्याला फिरकलो नाही.
हंपी दर्शन घेऊन परत त्याच ढाब्यावर मुक्कामी गेलो. ज्या ढाबा मालकाच गुणगान मागच्या लेखात केलं त्याच्या मुलाने जाम इज्जत काढली आणि तिथून आम्हाला गाशा गुंडाळून निघाव लागलं. वाटेत एक मंदिर दिसलं त्याच्या बाहेर टेन्ट लावला इतक्यात काही लोकं तिथं आली आणि आम्हाला म्हटले कार्यालयात झोपा. आम्ही तंबू आत हलवला आणि झोपून टाकलं. सकाळी मी लवकर उठलो आणि मोबाईल चार्जिंग करावा म्हणून plug कडे गेलो. Plug मध्ये चार्जर घातला तसा बाहेर dp मध्ये मोठा स्फोट झाला आणि अख्या मंदिराची लाईट गेली. हा प्रकार बडेंनी बघितला आणि विचारलं " मास्तर आता काय काशी केली?" मी सांगितलं "It's time to run😂". पोरांनी तंबू तसाच गाडीत घातला आणि बाकीचे लोक उठायच्या आधी धूम ठोकली.
2 टिप्पण्या
😂👌👌👍
उत्तर द्याहटवा😂😂😂just imagin
उत्तर द्याहटवा